5G च्या तयारीला लागा! मोदी सरकारच्या जिओ, एअरटेल, व्हीआयला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:39 PM2022-08-18T13:39:00+5:302022-08-18T13:39:35+5:30

एअरटेल की जिओ ५जी सेवा पहिल्यांदा सुरु करणार अशी स्पर्धा रंगलेली असताना आता व्हीआयने देखील तयारी पूर्ण केल्याचे  वृत्त आले आहे. व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत.

5G service to come: Govt issues assignment letters; telcos asked to prepare for launch network | 5G च्या तयारीला लागा! मोदी सरकारच्या जिओ, एअरटेल, व्हीआयला सूचना

5G च्या तयारीला लागा! मोदी सरकारच्या जिओ, एअरटेल, व्हीआयला सूचना

Next

सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरना ५जी स्पेक्ट्रमची असाईनमेंट लेटर दिली आहेत. याचबरोबर ५जी लाँचिंगची तयारी करण्यास सांगितले आहे. यामुळे पुढील काही दिवसांत ५जी सेवा लाँच होण्याची शक्यता वाढली आहे. 

5G smartphone Guide: 5G येण्याआधी स्मार्टफोन घ्यायचाय? हे आहेत बेस्ट ऑप्शन, किंमतही १० हजारांपासून सुरु

एअरटेल की जिओ ५जी सेवा पहिल्यांदा सुरु करणार अशी स्पर्धा रंगलेली असताना आता व्हीआयने देखील तयारी पूर्ण केल्याचे  वृत्त आले आहे. व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत. यामुळे लवकरच व्होडाफोनही भारतात फाईव्ह जी लाँच करेल असे दिसत आहे. व्होडाफोनने ही सेवा कधीपर्यंत लाँच केली जाईल याची अधिकृत माहिती दिलेली नाहीय. मात्र, टेलिकॉम इंडस्ट्रीतील सुत्रांनुसार कंपनी याच महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्येच 5G सर्विस लाँच करण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरुवातीला अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या १३ शहरांत केली जाणार आहे.  

5G Expense: 5G येताच एकरकमी 15 हजारांचा खर्च करावा लागणार; समोर आली महत्वाची माहिती

एअरटेलदेखील ऑगस्टच्या अखेरीस ५जी सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे. एअरटेल कंपनीने लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये 19867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते.  तर रिलायन्स जिओदेखील 5G सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे. यामुळे एकामागोमाग एक अशा तीन कंपन्या देशभरात ५जी सेवा लाँच करणार आहेत. 

बाजारात १० हजार रुपयांपासून फाईव्ह जी रेडी फोन मिळत आहेत. परंतू, ते सगळ्याच ठिकाणी चालतील असे कोणतीच कंपनी ठोस सांगू शकत नाही. कारण प्रत्येक कंपनीने वेगवेगळे स्पेक्ट्रम आणि बँडविड्थ विकत घेतल्या आहेत. ग्रामीण भागात, निमशहरी आणि महानगरांमध्ये या वेगवेगळ्या स्पेक्ट्रमवर कंपन्या फाईव्ह जी सेवा देणार आहेत. यामुळे किती बँडचा मोबाईल घ्यावा, यावर सारे गणित ठरणार आहे.

Web Title: 5G service to come: Govt issues assignment letters; telcos asked to prepare for launch network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.