भारतात 5जी स्पीड सुसाट, रशिया-अर्जेंटिनाही मागे; डेटा स्पीडमध्ये ११५ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:41 AM2023-03-04T07:41:04+5:302023-03-04T07:41:19+5:30
सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर नेटवर्क आता स्थिर होऊ लागले असून, भारतीय ग्राहक ५०० एमबीपीएसपर्यंतदेखील डाऊनलोड स्पीड अनुभवत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारतात ५जी सेवा सुरू होऊन जवळपास सहा महिन्यांनंतर आता ५जी स्पीडच्या बाबतीत भारताने मेक्सिको, रशिया आणि अर्जेंटिना यांसारख्या काही जी२० देशांनाही मागे टाकले आहे. इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या आशियाई देशांच्याही पुढे आहे. ‘उकला’ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार ५जी सेवा सुरू केल्यापासून भारताच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर नेटवर्क आता स्थिर होऊ लागले असून, भारतीय ग्राहक ५०० एमबीपीएसपर्यंतदेखील डाऊनलोड स्पीड अनुभवत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
११५%
वाढ डेटा स्पीडमध्ये
सप्टेंबर २०२२ मध्ये भारतातील सरासरी डाऊनलोड स्पीड १३.८७ एमबीपीएस होता, जानेवारी २०२३ मध्ये स्पीड ११५ टक्क्यांनी वाढून २९.८५ एमबीपीएस झाला आहे.
४९
स्थानांची झेप
स्पीडटेस्टच्या जागतिक क्रमवारीतही भारताने सप्टेंबर २०२२ मधील ११८व्या क्रमांकावरून ४९ स्थानांची झेप घेतली असून, ६९व्या क्रमांकावर आला आहे.
भारतात सर्वोत्तम कामगिरी कोणाची?
जानेवारी २०२३
एमबीपीएसमध्ये
कोलकाता
जिओ : ५०६.२५
दिल्ली
एअरटेल २६८.८९
स्पीड रेंज (जिओ) २४६.४९ - ५०६.२५
स्पीड रेंज (एअरटेल) ७८.१३ - २६८.८९
देशांची क्रमवारी आणि सरासरी डाऊनलोड स्पीड (एमबीपीएसमध्ये)
१ यूएई १६१.१५
२ कतर १५५.५१
३ नॉर्वे १३६.०८
४ द. कोरिया १२४.८४
५ डेन्मार्क ११७.८३
६९ भारत २९.८५
कमी ५जी रोलआउटचा व्हीआयला फटका
१.८८% व्हीआय ग्राहक जिओकडे वळले
१.३२%
व्हीआय ग्राहक एअरटेलकडे
व्हाेडाफाेन-आयडीयाने अद्याप ५जी सेवा सुरू केलेली नाही. कंपनीचे ग्राहक सातत्याने कमी हाेत आहेत. सरकारने १,६०० काेटींचा दंड समभागात परिवर्तित केला आहे. तरीही ग्राहक कंपनीपासून दूर जात असल्याचे आकडेवारी सांगते.