WhatsApp OTP Scam म्हणजे नेमकं काय?, जाणून घ्या कसा करायचा फ्रॉडपासून बचाव
By सायली शिर्के | Published: November 23, 2020 01:06 PM2020-11-23T13:06:32+5:302020-11-23T13:22:45+5:30
WhatsApp OTP Scam : व्हॉट्सअॅपशी संबंधित नवनवीन फ्रॉड केले जात आहेत.
नवी दिल्ली - सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट होता येतं. अनेक गोष्टी शेअर करता येतात. मात्र अनेकदा फेक मेसेजमुळे काही अडचणींचा देखील सामना करावा लागतो. सातत्याने विविध गोष्टी या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र सध्या हे हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअॅपशी संबंधित नवनवीन फ्रॉड केले जात आहेत.
सध्या एका नव्या प्रकारचा स्कॅम हा व्हॉट्सअॅपवर सुरू करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने एखादा मित्रचं आपलं अकाऊंट हॅक करू शकतो. WhatsApp OTP स्कॅम म्हणजे नेमकं काय? आणि यापासून कसा बचाव करायचा हे जाणून घेऊया. व्हॉट्सअॅप ओटीपी स्कॅममध्ये स्कॅमर सर्वप्रथम युजर्सना त्याच्याच एका मित्राच्या नावाने मेसेज पाठवतात. तसेच तुमचा मित्र अडचणीत असल्याचं त्यामध्ये सांगितलं जातं. अनेकदा हॅकर्स मित्रांच्या नंबरवरूनच मेसेज करतात.
WhatsApp OTP स्कॅम म्हणजे नेमकं काय?
हॅकर्सच्या जाळ्यात अडकून मेसेजला रिप्लाय केल्यास हॅकर्सकडून आणखी एक मेसेज पाठवला जातो. त्यानंतर ओटीपी विचारला जाईल. चुकून हा मेसेज तुम्हाला पाठवला असं सांगून हॅकर तोच मेसेच पुन्हा त्याला फॉरवर्ड करायला सांगेल. मात्र यामागचं खरं कारण म्हणजे हे मुद्दाम ओटीपीच्या माध्यमातून युजर्सचं अकाऊंट हॅक करण्यासाठी करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्सनी सावध राहणं गरजेचं आहे.
ओटीपी सांगितल्यास तुमच्या नंबरच्या मदतीने हॅकरच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू होईल. कारण व्हॉट्सअॅप नव्या डिव्हाईसमध्ये सुरू करण्यासाठी फक्त एका ओटीपीची गरज असते. तो हॅकरने युजर्सकडून मागितलेला असतो. याचाच गैरफायदा घेऊन हॅकर्स आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून पैसे मागू शकतात अथवा त्यांना ब्लॅकमेल करण्यासारखे फ्रॉड करतात.
WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आता चॅटिंग होणार आणखी मजेशीरhttps://t.co/3sAxHZcQOT#WhatsApp#tech#Mobile
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2020
WhatsApp वेबवरून काम करणं सोपं होणार; व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंगची मजा घेता येणार
असा करा फ्रॉडपासून बचाव
व्हॉट्सअॅप ओटीपी स्कॅमपासून बचाव करता येऊ शकतो. फ्रॉडपासून बचाव करायचा असल्यास कोणासोबत कधीच आपला ओटीपी शेअर करू नका. व्हॉट्सअॅपमध्ये टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन करा. तसेच ओटीपीसोबतच आणखी एका कोडची आवश्यकता असते. जो फक्त युजर्सकडेच असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
WhatsApp युजर्ससाठी खूशखबर!https://t.co/0pRZCsr1WM#WhatsApp#technology
— Lokmat (@MiLOKMAT) October 20, 2020