6000mAh बॅटरी असलेला Redmi फोन 10,000 पेक्षा कमी किंमतीत; इतक्या स्वस्तात मिळणार नाही 6GB RAM
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:57 PM2022-06-16T17:57:50+5:302022-06-16T17:58:11+5:30
Xiaomi चा बजेट स्मार्टफोन Redmi 10 आणखी स्वस्त झाला आहे. त्यामुळे खूप कमी किंमतीत 6GB RAM आणि 6000mAh बॅटरी असलेल फोन मिळत आहे.
Xiaomi नं मार्चमध्ये आपला 6GB RAM असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन Redmi 10 नावानं ग्राहकांच्या भेटीला आला होता. आता या 6000mAh बॅटरी असलेल्या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच स्वस्त असलेला Redmi 10 स्मार्टफोनचे दोन्ही व्हेरिएंट आणखी किफायतशीर झाले आहेत.
Redmi 10 ची नवीन किंमत
10,999 रुपयांच्या Redmi 10 च्या 4GB रॅम 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे हा बेस व्हेरिएंट आता 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6GB रॅम 128GB स्टोरेज मॉडेलसाठी आता 12,999 रुपयांच्या ऐवजी 12,499 रुपये मोजावे लागतील, या मॉडेलची किंमत 500 रुपयांनी कमी झाली आहे. हा फोन पॅसिफिक ब्लू, कॅरिबियन ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक कलरमध्ये Mi.com वरून विकत घेता येईल. ICICI बँकेच्या कार्डवर 1,250 रुपयांची तात्कळ सूट देखील मिळत आहे.
Redmi 10 2022 चे स्पेसिफिकेशन्स
Redmi 10 मध्ये 6.71-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 वर चालतो . यात प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 680 SoC देण्यात आली आहे. तर ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो. या देण्यासाठी फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं तर व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 2GB पर्यंत रॅम वाढवता येतो.
फोटोग्राफीसाठी Redmi 10 2022 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5MP चा सेन्सर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मोठी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.