6000mAh च्या बॅटरीची पावर परवडणाऱ्या किंमतीत; 11GB रॅमसह नवा Redmi Phone आला

By सिद्धेश जाधव | Published: April 20, 2022 03:01 PM2022-04-20T15:01:19+5:302022-04-20T15:02:21+5:30

Redmi 10 Power स्मार्टफोन 15 हजारांच्या आत आला आहे. ज्यात 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट, 11GB RAM आणि 6,000mAh ची मोठी बॅटरी मिळते.

6000mAh Battery Phone Redmi 10 Power Launched In India At Rs 14999 Price   | 6000mAh च्या बॅटरीची पावर परवडणाऱ्या किंमतीत; 11GB रॅमसह नवा Redmi Phone आला

6000mAh च्या बॅटरीची पावर परवडणाऱ्या किंमतीत; 11GB रॅमसह नवा Redmi Phone आला

Next

Xiaomi नं भारतात आपले दोन नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Redmi ब्रँड अंतर्गत सादर केले आहेत. Redmi 10A ची किंमत 10 हजारांच्या आत ठेवण्यात आली आहे. तर Redmi 10 Power स्मार्टफोन 15 हजारांच्या आत आला आहे. ज्यात 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट, 11GB RAM आणि 6,000mAh ची मोठी बॅटरी मिळते.  

Redmi 10 Power चे स्पेसिफिकेशन्स 

रेडमी 10 पावर स्मार्टफोनमध्ये 6.71 इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी पॅनल वॉटरड्रॉप नॉचसह येतो. फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट दिला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू मिळतो. यात 8GB RAM सोबत 3 जीबी एक्सपांडेबल रॅम मिळतो, त्यामुळे एकूण 11 जीबी रॅम होतो. सोबत 128GB स्टोरेज आहे.  

रेडमी 10 पावरच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आहे. समोर 5 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा आहे. परंतु रेडमी 10 पावर स्मार्टफोनमधील 6,000एमएएचची मोठी बॅटरी याची खासियत म्हणता येईल.  

Redmi 10 Power ची किंमत 

रेडमी 10 पावर स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला एकच व्हेरिएंट भारतात आला आहे. ज्याची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा कधी आणि कुठून विकत घेता येईल, याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.  

Web Title: 6000mAh Battery Phone Redmi 10 Power Launched In India At Rs 14999 Price  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.