6000mAh बॅटरी असलेला Samsung चा स्वस्त फोन लाँच, फ्लिपकार्टवरून होणार विक्री  

By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2022 01:45 PM2022-06-22T13:45:53+5:302022-06-22T13:46:31+5:30

Samsung Galaxy F13 स्मार्टफोनमध्ये 6000mAh च्या मोठ्या बॅटरीसह 4GB RAM, Exynos 850 चिपसेट, अँड्रॉइड 12 आणि 50MP चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

6000mAh Battery Phone samsung galaxy f13 launched in India flipkart  | 6000mAh बॅटरी असलेला Samsung चा स्वस्त फोन लाँच, फ्लिपकार्टवरून होणार विक्री  

6000mAh बॅटरी असलेला Samsung चा स्वस्त फोन लाँच, फ्लिपकार्टवरून होणार विक्री  

Next

Samsung नं भारतात आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीनं आपल्या गॅलेक्सी एफ सीरिजचा विस्तार करत Samsung Galaxy F13 सादर केला आहे. या फोनची खासियत म्हणजे यात 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यात 4GB RAM, Exynos 850 चिपसेट, अँड्रॉइड 12 आणि 50MP चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy F13 चे स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंग गॅलेक्सी एफ13 मध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. हा फोन कंपनीच्या Exynos 850 चिपसेटवर चालतो. सोबत 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. अतिरिक्त रॅम हवा असल्यास व्हर्च्युअली वाढवता येईल. फोन अँड्रॉइड 12 बेस्ड वनयुआय 4.0 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी F13 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. यात 50MP चा प्रायमरी सेन्सर, 5MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो शूटर आहे. यात सेल्फीसाठी फ्रंटला 8MP चा सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.   

Samsung Galaxy F13 ची किंमत  

सॅमसंग गॅलेक्सी एफ13 चे दोन मॉडेल भारतात लाँच करण्यात आले आहेत. यातील 4GB रॅम व 64GB स्टोरेज असलेला बेस मॉडेल 11,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर 4GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 12,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन 29 जून दुपारी 12 वाजल्यापासून ब्लू, ग्रीन आणि कॉपर कलर ऑप्शनमध्ये फ्लिपकार्टसह आणि सॅमसंगच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल.   

Web Title: 6000mAh Battery Phone samsung galaxy f13 launched in India flipkart 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.