जियोफोन नेक्स्ट टिकणार सुद्धा नाही याच्यासमोर; 6,000mAh Battery सह किफायतशीर Tecno POP 5 Pro ची होणार एंट्री  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 03:42 PM2022-01-17T15:42:38+5:302022-01-17T15:43:01+5:30

6000mAh Battery Phone: टेक्नोनं नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. नव्या फोनच्या टीजर नुसार हा फोन 6000mAh बॅटरीसह बाजारात येईल.

6000mah battery phone tecno pop 5 pro india launch soon  | जियोफोन नेक्स्ट टिकणार सुद्धा नाही याच्यासमोर; 6,000mAh Battery सह किफायतशीर Tecno POP 5 Pro ची होणार एंट्री  

जियोफोन नेक्स्ट टिकणार सुद्धा नाही याच्यासमोर; 6,000mAh Battery सह किफायतशीर Tecno POP 5 Pro ची होणार एंट्री  

Next

TECNO Mobile ने गेल्या आठवड्यात भारतात Tecno POP 5 LTE स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनची किंमत 6,299 रुपये ठेवण्यात आली आहे. एवढ्या कमी किंमतीत देखील हा फोन 5000mAh बॅटरी, मीडिया टेक प्रोसेसर आणि 8MP चा कॅमेरा असे फीचर्स देतो. कंपनी आता या सीरीजमध्ये नवीन Tecno POP 5 Pro देखील सादर करणार आहे.  

Tecno POP 5 Pro च्या लाँचची माहिती कंपनीनं ट्वीट करून दिली आहे. या ट्विटमध्ये हा फोन लवकरच भारतात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीनं फक्त या स्मार्टफोनचा नाव सांगितलं तर 6,000एमएएच्या मोठ्या बॅटरीची माहिती दिली आहे. Tecno POP 5 Pro या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच असलेला मोठा डिस्प्ले मिळेल. या फोनच्या लाँचची अचूक तारीख येणं बाकी आहे.  

जुन्या Tecno Pop 5 LTE चे स्पेसिफिकेशन्स  

टेक्नो पॉप 5 एलटीईची बॉडी पॉलिकार्बोनेट अर्थात प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे. यात डॉट नॉच डिजाईन असलेला मिळतो. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत परंतु तळाला रुंद चीन दिसते. Tecno POP 5 LTE फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. हा अँड्रॉइड फोन UNISOC SC9863 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी PowerVR GE8322 GPU देण्यात आला आहे. कंपनीनं यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते.   

टेक्नो पॉप 5 एलटीईच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 0.3 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. डिवाइसमधील 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देखील फ्लॅश लाईटने सुसज्ज आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळतं. टेक्नो पॉप 5 एलटीई मध्ये कंपनीनं 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.    

हे देखील वाचा:

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

आजूबाजूच्या आवाजच भान ठेवत म्युजिक ऐकण्यासाठी OnePlus Buds Z2 मध्ये खास मोड; किंमतीही बजेटमध्ये

Web Title: 6000mah battery phone tecno pop 5 pro india launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.