15 हजारांच्या आत फाडू फोन; 11GB RAM, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro ची भारतात एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: March 1, 2022 12:18 PM2022-03-01T12:18:27+5:302022-03-01T12:18:35+5:30
Poco M4 Pro Launch: Poco M4 Pro मध्ये 6GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 64MP Camera आणि 33W 5,000mAh Battery, असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
POCO भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन 15 हजारांच्या बजेटमध्ये इतर कंपन्यांना टक्कर देईल. हा फोन देशात POCO M4 Pro नावानं सादर करण्यात आला आहे. ज्यात 6GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 64MP Camera आणि 33W 5,000mAh Battery, असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
POCO M4 Pro चे स्पेसिफिकेशन्स
पोको एम4 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा डिवाइस अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी96 चिपसेट आणि माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. यातील टर्बो रॅम टेक्नॉलॉजी अतिरिक्त 3GB रॅम देते.
फोटोग्राफीसाठी पोको एम4 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी POCO M4 Pro स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हा फोन फोन आयपी53 रेटिंगसह येतो. पावर बॅकअपसाठी या पोको फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.
POCO M4 Pro ची किंमत प्राईस
पोको एम4 प्रो चे तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. यातील 6 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसाठी 16,499 रुपये द्यावे लागतील. तसेच POCO M4 Pro चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पोको एम4 प्रो ची विक्री 7 मार्चपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल.
हे देखील वाचा:
- MWC 2022: अगदी छोटे डिटेल्सही दिसतील या 10.61 इंचाच्या 2K डिस्प्लेवर; दमदार बॅटरीसह Lenovo चा फाडू टॅब आला
- 32GB रॅम आणि 21 तास बॅटरी लाईफसह Samsung चे दोन दमदार लॅपटॉप Galaxy Book 2 Pro आणि Book 2 Pro 360 लाँच
- MWC 2022: बड्या कंपन्यांच्या यादीत Realme चा देखील समावेश; जागतिक बाजारात सादर केली सर्वात शक्तिशाली सीरिज