युट्युबर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार हा फोन; 64MP Selfie Camera असल्यावर प्रोफेशनल Vlog कॅमेऱ्याची गरज नाही 

By सिद्धेश जाधव | Published: February 8, 2022 05:20 PM2022-02-08T17:20:29+5:302022-02-08T17:21:55+5:30

64MP Vlog Camera phone Honor 60 SE 5G: Honor 60 SE 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, MediaTek आणि Dimensity 9000 SoC मिळतो. परंतु या हँडसेटमधील 64MP Selfie Camera लक्ष वेधून घेतो.

64MP Vlog Camera phone Honor 60 SE 5G launched with 8GB RAM MediaTek Dimensity 9000 SoC  | युट्युबर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार हा फोन; 64MP Selfie Camera असल्यावर प्रोफेशनल Vlog कॅमेऱ्याची गरज नाही 

युट्युबर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार हा फोन; 64MP Selfie Camera असल्यावर प्रोफेशनल Vlog कॅमेऱ्याची गरज नाही 

Next

HONOR नं आपल्या ऑनर 60 सीरीजमध्ये Honor 60 आणि Honor 60 Pro नंतर आता Honor 60 SE 5G स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन देखील चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. यात 8GB RAM, MediaTek आणि Dimensity 9000 SoC मिळतो. परंतु या हँडसेटमधील 64MP Selfie Camera लक्ष वेधून घेतो. चला जाणून घेऊया Honor 60 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत. 

Honor 60 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Honor 60 SE 5G फोनमध्ये फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनच्या डिस्प्लेचा आकार केवढा आहे, हे मात्र समजलं नाही. हा फोन अँड्रॉइड आधारित मॅजिक युआय 5.0 वर चालतो. यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेट देण्यात आला आहे. हा मोबाईल फोन 66वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 

ऑनर 60 एसई 5जी मधील 64 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा या फोनची खासियत आहे. कंपनीनं याला 64MP Vlog Camera असं नाव दिलं आहे. हा कॅमेरा डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी असलेल्या पंच-होलमध्ये बसवण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग सोबतच हाय क्वॉलिटी व्हिडीओज बनवण्यासाठी या सेल्फी कॅमेऱ्याची मदत होईल.  

फोटोवरून तुम्हाला समजलं असेलच कि या फोनमध्ये Apple iPhone 13 Pro Max च्या रियर कॅमेरा सेटअपसारखी डिजाईन दिली आहे. Honor 60 SE 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे.  

Honor 60 SE 5G ची किंमत  

ऑनर 60 एसई 5जीचे दोन व्हेरिएंट्स आले आहेत. याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 2,199 युआन (जवळपास 25,700 रुपये) आहे. तर 8GB RAM आणि 256GB storage असलेल्या मोठ्या व्हेरिएंटची किंमत 2,499 युआन (सुमारे 29,000 रुपये) आहे.  

हे देखील वाचा:

Galaxy S22 च्या लाँचमुळे iPhone 13 वर मिळतोय 23000 रुपयांचा डिस्काउंट; सोडू नका शानदार ऑफर

6000mAh बॅटरी, 11GB रॅमसह आला फाडू 5G SmartPhone; रेडमी-रियलमीची करणार सुट्टी!

Web Title: 64MP Vlog Camera phone Honor 60 SE 5G launched with 8GB RAM MediaTek Dimensity 9000 SoC 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.