सुस्साट! भारतात वेगवान 6G नेटवर्कच्या तयारीला सुरुवात; 5G पेक्षा 50 पट मिळणार डाउनलोड स्पीड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:35 PM2021-10-11T19:35:01+5:302021-10-11T19:35:26+5:30
6G In India: टेलिकॉम सचिव K Rajaraman यांनी C-DoT ला 6G आणि भविष्यातील इतर टेक्नॉलॉजीजवर काम करण्यास सांगितले आहे.
भारतात सध्या 5G च्या चाचण्या सुरु आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या हातात 5G यायला अजून खूप वेळ आहे. दरम्यान सरकारने देशात मोबाईलच्या 6G नेटवर्कच्या ट्रायलची तयारी सुरु केल्याची बातमी आली आहे. टेलीकॉम विभागने सरकारी टेलीकॉम रिर्सच कंपनी सी- डॉट (C-DoT) ला याची जबाबदारी दिली आहे. सी-डॉटला मोबाईलसाठी 6G नेटवर्कवर काम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
टेलिकॉम सचिव K Rajaraman यांनी C-DoT ला 6G आणि भविष्यातील इतर टेक्नॉलॉजीजवर काम करण्यास सांगितले आहे. जगभरातील इतर कंपन्यांना आव्हान देण्यासाठी हे काम वेळेवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2028-2030 पर्यंत जगभरात 6G कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या जगात सॅमसंग, हुवावे, एलजी आणि इतर कंपन्यांनी 6G टेक्नॉलॉजीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. 6G टेक्नॉलॉजी 5G टेक्नॉलॉजीपेक्षा 50 पटीने वेगवान डाउनलोड स्पीड देऊ शकते.
LG ची 6G चाचणी
एलजी आणि फ्रॉनहॉफर-गेसेलशॉफ्ट यांनी एकत्रिरीत्या जर्मनीमधील बर्लिन शहरात wireless 6G terahertz ची यशस्वी चाचणी केली आहे. या टेस्टमध्ये टेराहर्ट्ज (THz) स्पेक्ट्रमचा वापर करून Fraunhofer Heinrich Hertz Institute (HHI) आणि Berlin Institute of Technology दरम्यान डेटा ट्रान्सफर करण्यात आला आहे. ही टेस्ट प्रयोगशाळेत करण्यात आली नसून 100 मीटर अंतरावर असलेल्या दोन इमारतींमध्ये करण्यात आली आहे. 6G चा वापर ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी आणि मिक्स्ड रिअलिटीसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. यामुळे मनोरंजन, आरोग्य, विज्ञान, शिक्षण आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये प्रगती करता येईल.