6G Technology: एका सेकंदात 142 तासांचे व्हिडिओ डाउनलोड; 6G वर मिळणार 5Gपेक्षा 100 पट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 03:04 PM2022-06-08T15:04:43+5:302022-06-08T15:06:19+5:30

6G Technology: जगातील अनेक देशांमध्ये 5G सुविधा उपलब्ध असून, आता 6G वर विचार सुरू आहे.

6G Technology: 142 hours of video download per second; 6G will get 100 times faster than 5G | 6G Technology: एका सेकंदात 142 तासांचे व्हिडिओ डाउनलोड; 6G वर मिळणार 5Gपेक्षा 100 पट स्पीड

6G Technology: एका सेकंदात 142 तासांचे व्हिडिओ डाउनलोड; 6G वर मिळणार 5Gपेक्षा 100 पट स्पीड

googlenewsNext

6G Technology: भारतात अद्याप 5G सेवा सुरू झालेली नाही, मात्र जगभरात 6G ची चर्चा सुरू झाली आहे. अनेक देशांमध्ये 5G सेवा सुरू झाल्यापासून लोक या सेवेचा वापर करत आहेत. अशा लोकांना आता पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानात रस आहे. 5G नंतर आता अनेकजण 6G चा विचार करत आहेत.

6G बाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. पण, प्रत्यक्षात 6G येण्यासाठी काही वर्षे लागतील. चीन आणि इतर देशांनी 6G वर काम सुरू केले आहे. भारतदेखील 6G साठी तयारी करत आहे. भारत सरकारने या वर्षी मार्चमध्ये सांगितले होते की, 2030 पर्यंत भारतात 6G नेटवर्क उपलब्ध होईल. 6G संदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात येतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

6G मध्ये किती स्पीड मिळेल?
6G तंत्रज्ञान 5G पेक्षा सुमारे 10 पट वेगवान असेल. तर, काही तंत्रज्ञ म्हणतात की, 5G पेक्षा 6G चा वेग जवळपास 100 पट जास्त असेल. सिडनी विद्यापीठातील वायरलेस कम्युनिकेशन एक्सपर्ट मह्यार शिरवानीमोघड्डम यांच्या मते, 6GB नेटवर्कवर 1TB प्रति सेकंद इतका वेग मिळवू शकतो.

एका सेकंदात व्हिडिओ डाउनलोड
तुम्ही हा वेग अशा प्रकारे समजू शकता की, नेटफ्लिक्सवरील उत्तम दर्जाच्या कंटेंटसाठी प्रति तास 56GB डेटा आवश्यक आहे. 6G वेगाने, तुम्ही नेटफ्लिक्सचे 142 तासांचे उच्च दर्जाचे व्हिडिओ सेकंदात डाउनलोड करू शकता. 6G तंत्रज्ञानाच्या आगमनाने, अनेक नवीन अनुप्रयोग आणि सेवा देखील अस्तित्वात येतील. या तंत्रज्ञानामुळे लोकांची जीवनशैली आणि काम करण्याची पद्धतही बदलणार आहे.

कसे तंत्रज्ञान येणार?
5G च्या आगमनापूर्वीच, IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) उत्पादने एक वास्तविकता बनली आहेत. 5G च्या आगमनाने मेटाव्हर्सचे युग सुरू झाले आहे. IoT तंत्रज्ञान सतत विकसित होत आहे. घराच्या बल्बपासून ते दारापर्यंत सर्व काही इंटरनेटशी जोडले गेले आहे. 6G आल्यानंतर अशा उपकरणांची संख्या वाढेल. अहवालानुसार, 6G नेटवर्कच्या आगमनानंतर, 5G पेक्षा 10 पट अधिक अशी उपकरणे प्रति स्क्वेअर किलोमीटरवर दिसतील. म्हणजेच येत्या काही दिवसांत आता आणखी IoT उपकरणे पाहायला मिळतील. 

Web Title: 6G Technology: 142 hours of video download per second; 6G will get 100 times faster than 5G

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.