6G Launch Date: सुपरफास्ट! लवकरच 6G चं ट्रायल सुरू होणार, Nokia सोबत करार, भारतात केव्हा येणार? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:02 PM2022-06-10T19:02:45+5:302022-06-10T19:03:48+5:30

जगभरात 5G चे नेटवर्क अजूनही विस्तारलं गेलेलं नाही. पण अनेक देशांनी चक्क 6G ची तयारी देखील सुरू केली आहे. जपान देखील 6G ची चाचणी सुरू करणार आहे.

6g trials to start soon in japan nokia joins hand when will 6g launch in india | 6G Launch Date: सुपरफास्ट! लवकरच 6G चं ट्रायल सुरू होणार, Nokia सोबत करार, भारतात केव्हा येणार? वाचा...

6G Launch Date: सुपरफास्ट! लवकरच 6G चं ट्रायल सुरू होणार, Nokia सोबत करार, भारतात केव्हा येणार? वाचा...

Next

नवी दिल्ली-

जगभरात 5G चे नेटवर्क अजूनही विस्तारलं गेलेलं नाही. पण अनेक देशांनी चक्क 6G ची तयारी देखील सुरू केली आहे. जपान देखील 6G ची चाचणी सुरू करणार आहे. जपानमध्ये 6G साठी घरगुती टेक्नोलॉजी बेस आणि नेटवर्क तयार करण्यास सुरुवात केली आहे. ६ जून रोजी जपानच्या प्रमुख टेलिकॉम कंपनी असलेल्या NTT DOCOMO नं NEC, Fujitsu आणि Nokia सोबत मिळून 6G ची चाचणी करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. यासोबतच २०३० पर्यंत 6G च्या व्यावसायिक लॉन्चसाठी या कंपन्यांनी ट्रायल प्लान सुरू करण्याचीही घोषणा केली आहे. 

मे महिन्यात जपानच्या Network Research Institute नं NICT मध्ये केलेल्या घोषणेनुसार जगातील पहिला 1 Petabit वर ट्रान्समिशन पूर्ण झालं आहे. हे ट्रान्समिशन स्टँडर्ड क्लॅडिंग डायमीटर मल्टी कोअर फायबरमध्ये करण्यात आलं आहे. 

नेमका किती स्पीड मिळणार?
एक Petabit म्हणजे १० लाख गिगाबाइट डेटा असा अर्थ होतो. 5G साठी सर्वाधिक 10 GBPS प्रति सेकंद ट्रान्समिशन डेटा मिळाला होता. यातुलनेत NICT चा डेमो एक लाख पटीनं वेगवान आहे. इंटरनॅशनल मोबाइल कम्युनिकेशन 2020 नं 5G साठी पीक डाऊनलिंक स्पीड 20Gbps आणि अपलिंक स्पीड 10Gbps इतका ठेवला होता. असं असलं तरी प्रत्यक्षात 5G चा स्पीड अपेक्षेपेक्षा खूप कमीच राहिलेला पाहायला मिळाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 6G वर युझर्सना 1TB प्रति सेकंद स्पीड मिळेल. 

भारतात 6G कधी येणार?
भारतात 5G ची यशस्वी चाचणी झाली आहे. पण 5G च्या लॉन्चिंगसाठी युझर्सना या वर्षाच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तर 6G संदर्भात देखील सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. TRAI च्या टास्क फोर्सनं 6G वर काम करण्यास सुरुवात केल्याची माहिती देण्यात आली होती. 5G आणि 6G स्पीडमुळे केवळ इंटरनेट स्पीड वाढणार नाही, तर यामुळे नोकऱ्या वाढतील आणि अर्थव्यवस्थेला देखील बूस्टर मिळेल असंही 'ट्राय'नं सांगितलं आहे.

Web Title: 6g trials to start soon in japan nokia joins hand when will 6g launch in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.