सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप! Nokia चा हा फोन रेडमी-रियलमीवर पडणार भारी, किंमतही बजेटमध्ये
By सिद्धेश जाधव | Published: April 26, 2022 03:30 PM2022-04-26T15:30:04+5:302022-04-26T15:31:01+5:30
Nokia G21 स्मार्टफोन भारतात 50MP Camera, 6GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,050mAh बॅटरीसह बाजारात आला आहे.
ठरल्याप्रमाणे Nokia नं आपला नवीन स्मार्टफोन कंपनीच्या ‘जी’ सीरिजमध्ये सादर केला आहे. Nokia G21 नावाचा हँडसेट लो बजेटमध्ये सादर करण्यात आला आहे. तरीही यात 50MP Camera, 6GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,050mAh बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या हँडसेटची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
Nokia G21 ची किंमत
Nokia G21 स्मार्टफोनचा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलसाठी 14,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन Nordic Blue आणि Dusk कलरमध्ये विकत घेता येईल. हा फोन प्रमुख ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल.
Nokia G21 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia G21 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Unisoc T606 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे, सोबत ग्राफिक्ससाठी Mali G75-MP1 जीपीयू मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम मिळतो, त्याचबरोबर 64GB आणि 128GB चे दोन स्टोरेज ऑप्शन आहेत. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. नोकियाचा स्मार्टफोनमध्ये Android 11 वर चालतो. यात 5,050mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे.