सावधान! तुमचा Facebook पासवर्ड चोरत आहेत ‘हे’ 7 अ‍ॅप्स, आत्ताच करा डिलीट 

By सिद्धेश जाधव | Published: May 18, 2022 08:13 PM2022-05-18T20:13:58+5:302022-05-18T20:14:06+5:30

Google Play Store वरील 200 पेक्षा जास्त अ‍ॅप्समध्ये ‘Facestealer’ नावाचं स्पायवेयर आढळलं आहे.  

7 Android Apps Are Stealing Facebook Credentials And Cryptocurrency Data See List   | सावधान! तुमचा Facebook पासवर्ड चोरत आहेत ‘हे’ 7 अ‍ॅप्स, आत्ताच करा डिलीट 

सावधान! तुमचा Facebook पासवर्ड चोरत आहेत ‘हे’ 7 अ‍ॅप्स, आत्ताच करा डिलीट 

Next

छोट्या छोट्या कामांसाठी आपण अनेक ऍप्स स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करतो. फक्त एकदा डिस्क्रिप्शन वाचून इन्स्टॉल केलेल्या ऍप्समध्ये अपडेटनंतर कोणते बदल होतात यावर आपलं लक्ष नसतं. या ऍप्सकडे आपल्या स्मार्टफोनवरील डेटाचा ऍक्सेस असतो. चुकीचे ऍप्समुळे हजारो लोक सायबर फ्रॉडला बळी पडतात. ताज्या रिपोर्ट्सनुसार असे काही अ‍ॅप्स तुमचं फेसबुक पासवर्ड आणि क्रिप्टोकरंसीचा डेटा चोरत आहेत.  

Trend Micro च्या ताज्या रिपोर्टनुसार अनेक अ‍ॅप्स युजर्सच्या फोनमधून फेसबुक डेटा व क्रिप्टोकंरसी सारखी संवेदनशील माहिती चोरत आहेत. रिपोर्टनुसार, Google Play Store वरील 200 पेक्षा जास्त अ‍ॅप्समध्ये ‘Facestealer’ नावाचं स्पायवेयर सापडलं आहे. तसेच काही सायबर सिक्योरिटी कंपन्यांनी 40 पेक्षा जास्त बनावट क्रिप्टोकरंसी मायनिंग अ‍ॅप्सना पकडले आहेत, जे युजर्सच्या फोन्समधून कमावलेली क्रिप्टोकरंसी चोरत आहेत.  

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये पुढील 7 अ‍ॅप्स पैकी एखादं अ‍ॅप इन्स्टॉल असेल तर ते त्वरित डिलीट करा. या सातही अ‍ॅप्समधील मालवेयर तुमची खाजगी माहिती इतरांशी शेयर करू शकतो. रिपोर्टनुसार हे अ‍ॅप युजर्सना फेसबुकवर लॉग-इन करण्याची परवानगी मागत होते. फेसबुक लॉग-इन केल्यावर URL मध्ये WebView येतो. कथितरित्या हा एक JavaScript कोड असतो, जो लोडेड पेजमध्ये येऊन युजरचे क्रिडेन्शियल चोरतो.   

हे Android अ‍ॅप्स आहेत घातक  

  1. Daily Fitness OL
  2. Enjoy Photo Editor
  3. Panorama Camera
  4. Photo Gaming Puzzle
  5. Swarm Photo
  6. Business Meta Manager 
  7. Cryptomining Farm Your personal Coin  

या अ‍ॅप्सच्या डेटा चोरीची माहिती मिळताच Google Play Store वरून हे हटवण्यात आले आहेत.  

Web Title: 7 Android Apps Are Stealing Facebook Credentials And Cryptocurrency Data See List  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.