रेडमी-रियलमीला म्हणाल ‘चल...’! 7,000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह ‘ही’ कंपनी आणतेय लो बजेट फोन
By सिद्धेश जाधव | Published: March 5, 2022 12:49 PM2022-03-05T12:49:23+5:302022-03-05T12:49:32+5:30
7000mAh Battery Phone Tecno Pova 3: आगामी Tecno Pova 3 स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे.
7000mAh Battery Phone Tecno Pova 3: Tecno ब्रँड अंतर्गत व्हॅल्यू स्मार्टफोन सादर केले जातात. कंपनी चांगले फीचर्स लो बजेटमध्ये देण्याचा प्रयत्न करते. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीनं भारतात स्मार्टफोन्स पोर्टफोलिओचा विस्तार सुरु ठेवला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये Tecno Pova 2 स्मार्टफोन 7000mAh बॅटरीसह भारतात आला होता. आता कंपनी या फोनचा नवीन व्हर्जन सादर करणार आहे, अशी बातमी आली आहे. टेक्नो मोबाईल्सचा हा स्मार्टफोन Tecno Pova 3 नावानं लवकरच ग्राहकांच्या भेटीला येईल.
आगामी Tecno Pova 3 स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे. तिथे या फोनची लिस्टिंग Tecno LF7 या कोडनेमसह करण्यात आली आहे. कंपनीनं जरी या फोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी लिस्टिंग्समधून खुलासा झाला आहे. गीकबेंचसह एफसीसीवरून देखील या मोबाईलच्या काही संभाव्य स्पेक्सची माहिती मिळाली आहे.
Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नो पोवा 3 स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 12 सह वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. यात कंपनीनं मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेटचा वापर प्रोसेसिंगसाठी केला आहे. हा फोन 6 जीबी रॅमसह बाजारात येतील. तसेच या टेक्नो मोबाईलमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग मिळेल. सोबत 7,000एमएएच बॅटरी देण्याची परंपरा कंपनी सुरु ठेवेल अशी अपेक्षा आहे. या फोनची डिजाईन पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.
Tecno Pova 2 स्पेसिफिकेशन्स
Tecno Pova 2 मध्ये 6.9-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा टेक्नो स्मार्टफोन Android 11 वर आधारित HiOS 7.6 वर चालतो.
Tecno Pova 2 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा AI फोटोग्राफी सेन्सर देण्यात आला आहे. हा फ्रंटला 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. टेक्नो पोवा 2 मध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी 18W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- लॅपटॉपवरही मिरवा Apple चा लोगो! 31 हजारांच्या जबरदस्त डिस्काउंटसह शक्तिशाली MacBook लॅपटॉप उपलब्ध
- Flipkart सेलची कृपा! फक्त 6 हजार रुपयांमध्ये Godrej चा फ्रिज, स्टॉक संपण्याआधीच करा बुक
- सत्या नाडेलांची दुखरी नस कोणालाच दिसली नाही! पण त्यांच्या मुलामुळे सेलेब्रल पाल्सीच्या लाखो रुग्णांना मोठी मदत झाली