Disney+ Hotstar सह 75GB मोफत डेटा, Viचे स्वस्त प्लॅन्स एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 04:41 PM2022-11-17T16:41:47+5:302022-11-17T16:42:20+5:30

Vi Recharge Plans: तुम्ही Vodafone Idea किंवा Viचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

75GB free data with Disney+ Hotstar, Vi's cheapest plans | Disney+ Hotstar सह 75GB मोफत डेटा, Viचे स्वस्त प्लॅन्स एकदा पाहाच...

Disney+ Hotstar सह 75GB मोफत डेटा, Viचे स्वस्त प्लॅन्स एकदा पाहाच...

Next

Vi Recharge Plans: Vodafone Idea किंवा Vi कडे आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी एकापेक्षा एक चांगले प्लॅन्स आहेत. या प्लॅन्समध्ये यूजर्सना फक्त Free Data नाही, तर कोणत्याही शुल्काशिवाय Disney+ Hotstarचे फायदेही मिळतात. आज आम्ही तुम्हाला असे काही Vi प्लॅन्स सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला अनेक बेनिफिट्स मिळतील.

Vi 3099 Plan Details: या VI प्रीपेड प्लॅनसोबत तुम्हाला दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच, वर्षभरात या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 730 GB हाय-स्पीड डेटा मिळत आहे.

75GB बोनस डेटा
या प्लॅनचे रिचार्ज तुम्ही केल्यास, तुम्हाला 75 GB बोनस डेटादेखील मिळतो. यासोबतच या प्लॅनमध्ये Disney Plus Hotstarचे 1 वर्षांचे सबस्क्रीप्शनदेखील मिळते. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अनलिमिटेड मोफत डेटा मिळतो. यासोबतच वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi मूव्हीज अँड टीव्हीचा फ्री अॅक्सेस मिळतो.

Vi 1499 Plan Details: या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकाला दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतात. याशिवाय, या प्लॅनमध्ये ग्राहकाला 50 GB फ्री डेटादेखील मिळतो. या प्लॅनची वैधता 180 दिवसांची आहे. बाकी वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्येही इतर सर्व बेनिफिट्स मिळतात.

Web Title: 75GB free data with Disney+ Hotstar, Vi's cheapest plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.