हा टीव्ही बघायला शेजारचेही येतील तुमच्या घरी; LG नं सादर केला 97 इंचाचा ढासू OLED TV, फीचर्स आहेत जबरदस्त
By सिद्धेश जाधव | Published: January 4, 2022 05:25 PM2022-01-04T17:25:33+5:302022-01-04T17:27:18+5:30
97 Inch Smart TV LG OLED G2: LG चा सर्वात छोटा आणि मोठा OLED टीव्ही CES 2022 मध्ये सादर करण्यात आला आहे.
LG नं आपली OLED TV ची रेंज वाढवली आहे. कंपनीनं CES 2022 मध्ये LG OLED G2 आणि C2 सीरीज जगासमोर ठेवली आहे. कंपनीनं या इव्हेंटमध्ये कंपनीचा सर्वात मोठा OLED TV सादर केला आहे. या टीव्हीचा आकार 97 इंच जो G2 OLED TV सीरीजमध्ये लाँच करण्यात आली आहे. हा एक स्मार्ट टीव्ही आहे त्यामुळे यात webOS सॉफ्टवेयर देण्यात आला आहे.
LG G2 सीरीजचे स्पेसिफिकेशन
LG G2 सीरीजसीरिज अंतर्गत 55, 65, 77, 83 आणि 97 इंचाचे टीव्ही सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं यात खूप स्लिम डिजाइन दिली आहे. या टीव्ही मॉडेल्समध्ये 120Hz 4K गेमिंग, वॅलिएबल रिफ्रेश रेट आणि ऑटो लो-लेटेंसी मोड असे फीचर्स देण्यात आले आहेत. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीचा 5th जेनरेशन A9 प्रोसेसर मिळतो. या सीरिजमधील मॉडेल्सची उपलब्धता आणि किंमत अजूनही गुलदस्त्यात आहेत.
LG C2 OLED टीव्ही सीरीजचे स्पेसिफिकेशन
या सीरीजमध्ये कंपनीचा सर्वात छोटा 42 इंचाचा OLED टीव्ही सादर करण्यात आला आहे. परंतु फीचर्स मात्र प्रीमियम आहेत. यात 5th जेनरेशन A9 प्रोसेसरसह वेबओएस देण्यात आला आहे. तसेच या टीव्ही मध्ये HDMI 2.1 पोर्ट्ससह 120Hz रिफ्रेश रेट असलेला 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील गेमिंग मोड पूर्णपणे अंधारलेल्या खोलीत देखील गेम खेळताना डोळ्यांवर ताण येऊ देत नाही. कंपनीनं या टीव्हीची देखील किंमत आणि उपलब्धता सांगितली नाही.
हे देखील वाचा:
न्यू ईयर गिफ्ट! व्हॉट्सॲपवर यंदा मिळणार भन्नाट फीचर्स
सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा...