इलॉन मस्क यांना मोठा झटका...! स्टारलिंकचे २० सॅटेलाइट पृथ्वीवर कोसळणार? लोकांना किती धोका?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 04:56 PM2024-07-13T16:56:21+5:302024-07-13T16:57:14+5:30
सॅटेलाइट लॉन्च करताना Falcon-९ रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचे इंजिन व्यवस्थित काम करू शकले नाही. परिणामी हे सॅटेलाइट खूप खालच्या कक्षेतच राहिले. यामुळे या उपग्रहांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असे SpaceX ने म्हटले आहे.
इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला मोठा झटका बसला आहे. आपले 20 नवे स्टारलिंक सॅटेलाइट पृथ्वीच्या दिशेने परत येणार आहेत, कारण ते लॉन्च करताना Falcon-९ रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचे इंजिन व्यवस्थित काम करू शकले नाही. परिणामी हे सॅटेलाइट खूप खालच्या कक्षेतच राहिले. यामुळे या उपग्रहांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असे SpaceX ने म्हटले आहे.
लोकांना किती धोका? -
SpaceX ने म्हणटले आहे, "आमच्या टीमने 10 सॅटेलाइटशी संपर्क साधला आणि त्यांना वर उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फारच खाली आले होते. त्यांना एवढ्या खालून वर उचलणे कठीन आहे. हे सॅटेलाइट हळू हळू वातावरणात प्रवेश करतानाच जळून नष्ट होतील. यापासून इतर कुठल्याही उपग्रहाला अथवा लोकांना कसल्याही प्रकारचा धोका नाही."
काय म्हणाले कंपनीचे CEO? -
"स्पेसएक्स कंपनीसाठी हे एक अयशस्वी लॉन्चिंग होते. स्पेसएक्स एक ग्लोबल सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्क तयार करण्यावर काम करत आहे. यामुळे सर्वत्र इंटरनेट पोहोचण्यास मदत मिळेल. हे 20 सॅटेलाइट जळण्याने या प्रोजेक्टला थोडा झटका बसला आहे. आपण अत्यंत वेगाने सॅटेलाइट चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही," असे कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोशल मीडियावरून म्हटले आहे.