जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर, Google आणि Microsoftला देणार टक्कर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:50 PM2022-09-27T19:50:30+5:302022-09-27T19:51:14+5:30

WhatsApp Call Link: व्हॉट्सअॅपने सोमवारी या नवीन फीचरची घोषणा केली आहे.

A new feature coming to WhatsApp, will compete with Google and Microsoft | जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर, Google आणि Microsoftला देणार टक्कर...

जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर, Google आणि Microsoftला देणार टक्कर...

Next

WhatsApp Call Link: Meta आपल्या प्रोडक्ट्समध्ये विविध फीचर आणत आहे. यातच आता मेटाने WhatsApp मध्ये एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने कंपनी Google Meets आणि Microsoft Teams सारख्या अॅप्सना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, WhatsApp इतर अॅप्सच्या तुलनेत खूप पुढे आहे. अॅक्टिव्ह यूजर्सच्या बाबतीत इतर अॅफ, WhatsApp च्या आसपासही नाही.

यूजर्सना उत्तमोत्तम अनुभव देण्यासाठी कंपनी व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने नवनवीन बदल करत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी कंपनीने एका नवीन फीचरची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून युजर्स या फीचरची वाटत पाहत होते. हे नवीन फीचर म्हणजे, Call Links आहे. Metaने सांगितल्यानुसार, या आठवड्याच्या अखेरीस हे फीचर सुरू होईल. 

काय आहे Call Links?
या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप यूजर्स कोणत्याही ऑनगोइंग कॉलमध्ये अॅड होऊ शकतील किंवा नवीन कॉल सुरू करू शकतील. Call Links चे फीचर अॅपच्या कॉलिंग टॅबमध्ये मिळेल. यूजर्स ऑडियो आणि व्हिडिओ कॉल साठी लिंक जनरेट करू शकतील आणि त्या लिंकला शेअर करू शकतील. Google Meet आणि Microsoft Teams प्रमाणे यावरही अनेक लोकांना अॅड होता येईल. 

अजून एक फीचर येणार
कॉल लिंक्ससोबत व्हॉट्सअॅपने ग्रुप व्हिडिओ कॉलबाबतही महत्वाची माहिती दिली. लवकरच व्हिडिओ कॉलवर 32 लोकांना अॅड करता येणार आहे. कंपनीने या फीचरची टेस्टिंग सुरू केली आहे. दरम्यान, Metaचे प्रमुख Mark Zuckerberg यांनी एका सोशल मीडिया पोस्टमधून WhatsApp वर येणाऱ्या नवीन फीचर्सबद्दल माहिती दिली आहे.
 

Web Title: A new feature coming to WhatsApp, will compete with Google and Microsoft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.