स्मार्ट वॉचनं वाचवला गर्भवती महिलेचा जीव; वेळीच अलर्ट केल्यानं मिळाली वैद्यकीय मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:22 PM2024-09-06T15:22:37+5:302024-09-06T15:23:00+5:30

ही समस्या लवकर समजल्यामुळे महिलेसह तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचला. Apple Watch च्या सतर्कतेमुळे आरोग्य तज्ज्ञ टीना गुयेन यांनी कौतुक केले.

A smart watch saved a pregnant woman life; Timely alert got medical help | स्मार्ट वॉचनं वाचवला गर्भवती महिलेचा जीव; वेळीच अलर्ट केल्यानं मिळाली वैद्यकीय मदत

स्मार्ट वॉचनं वाचवला गर्भवती महिलेचा जीव; वेळीच अलर्ट केल्यानं मिळाली वैद्यकीय मदत

Apple Watch नं एखाद्याचा जीव वाचवला हे पहिल्यांदाच घडलं नाही. अनेकदा या डिवाईसमधून यूजरला हृदयाशी संबंधित माहिती वेळच्या वेळी मिळते. त्यातच आता Apple Watch नं एका ८ महिन्याची गर्भवती महिलेला संभाव्य आरोग्य संकटाची वेळीच माहिती दिल्यानं तिचा जीव वाचला आहे. 

एबीसी रिपोर्टनुसार, Apple Watch मुळे रेचल मनालो जी बालहृदयरोग तज्ज्ञ आहे तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे. मनालो, जी सध्या ८ महिन्याची गर्भवती आहे, तिच्या वेगाने धडकणाऱ्या हृदयाचे ठोके अनुभवल्यानंतर हृदयाचे निरीक्षण करण्यासाठी घड्याळाचे EKG (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) फंक्शन वापरले. तिला चक्कर येत होती, श्वासोच्छवासाचा त्रास होत होता आणि थकल्यासारखे वाटत होते, परंतु गर्भधारणेचा भाग म्हणून तिने ही लक्षणे दूर केली होती.

हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मनालोला माहित होते की तिची लक्षणे असामान्य आहेत, परंतु जेव्हा तिच्या हृदयाची गती रति मिनिट १५० बीट्सपर्यंत पोहोचली तेव्हा ती चिंतित झाली. साधारणत: ६०-१०० बीट्स सामान्य मानले जातात. तिच्या ऍपल वॉचच्या EKG रीडिंगमध्ये " अस्पष्ट" परिणाम दिसून आले, ज्यामुळे तिने त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, ही समस्या लवकर समजल्यामुळे महिलेसह तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचला. Apple Watch च्या सतर्कतेमुळे आरोग्य तज्ज्ञ टीना गुयेन यांनी कौतुक केले. गर्भधारणेच्या अवस्थेत अशाप्रकारे हृदयाचे ठोके वेगाने वाढणे जीवघेणे असू शकते. आरोग्य उपकरणासारखे स्मार्ट वॉच हा डेटा देते परंतु लोकांना नेहमी डॉक्टरांशी चर्चा करायला हवी जेणेकरून समस्येचं योग्य निरसन केले जाईल. मनालोने आता एका मुलीला जन्म दिला असून तिचं वजन चार पाऊंड आहे. ती सध्या निरोधी आणि दोन्ही आई मुली सुखरुप आहेत. मनालोच्या हृदयाची गती ठीक आहे. मुलीच्या जन्मानंतर औषधे आणि किरकोळ सर्जरी करण्यात आली आहे. 
 

Web Title: A smart watch saved a pregnant woman life; Timely alert got medical help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.