Aadhaar Card : तुमच्या आधारशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत? अशाप्रकारे तपासू शकता संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 01:05 PM2022-06-05T13:05:16+5:302022-06-05T13:06:24+5:30
Aadhaar Card: दूरसंचार विभागाने (DoT) एक पोर्टल तयार केले आहे, जे तुम्हाला तुमच्या आधार कार्डाविरुद्ध जारी केलेले सिम कार्ड तपासण्यात मदत करेल.
नवी दिल्ली : आधार कार्ड हे भारतातील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, त्याशिवाय कोणतेही सरकारी किंवा गैर-सरकारी काम होत नाही. एवढेच नाही तर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही सिम खरेदी करू शकत नाही. दरम्यान, एखादी व्यक्ती त्याच्या आधार कार्डवरून जास्तीत जास्त 9 सिम जारी करू शकते. पण अनेक वेळा असंही घडतं की तुमच्या आधारावर कोणीतरी अनोळखी व्यक्ती सिम काढू शकते.
यासाठी, दूरसंचार विभागाने (DoT) एक पोर्टल तयार केले आहे, जे तुम्हाला तुमच्या आधार कार्डाविरुद्ध जारी केलेले सिम कार्ड तपासण्यात मदत करेल. या सेवेला टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (Telecom Analytics for Fraud management and COnsumer Protection - TAFCOP) असे म्हणतात. या ठिकाणी तुमच्या आधार कार्डशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे तुम्हाला कळेल. लक्षात ठेवा की तुम्ही कोणतेही सिम वापरत नसाल किंवा ते बंद असेल तर ते लगेच बंद करा.
तुमचा आधार कार्ड नंबर कसा तपासायचा?
- यासाठी सर्वात आधी TAFCOP च्या अधिकृत वेबसाइट https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जा.
- आता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि नंतर मोबाईल नंबरवर ओटीपी (OTP) येईल.
- यानंतर हा ओटीपी टाका आणि पोर्टलवर साइन इन करण्यासाठी व्हेरिफाय करा.
- आता साइन इन करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
- यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल जिथे तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले सर्व वेगवेगळे मोबाइल नंबर पाहू शकता.
रिपोर्ट दाखल करू शकता
जर तुम्हाला या पोर्टलवर असे कोणतेही सिम दिसले जे तुम्ही वापरत नाही, तर तुम्ही त्याचा रिपोर्ट दाखल करू शकता. रिपोर्ट दाखल करण्यासाठी, पोर्टलवर दर्शविलेल्या नंबरवर चेक मार्क करून This is not my number निवडा. आता खाली दिसत असलेल्या Report वर क्लिक करून तक्रार दाखल करा. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, तो क्रमांक तुमच्या आधार कार्डमधून हटवला जाईल.