नवजात बालकांचेही आधारकार्ड बनवता येते; पण प्रक्रिया थोडी वेगळी आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 11:16 AM2020-02-18T11:16:49+5:302020-02-18T11:22:21+5:30
आज अनेक सरकारी कामांसाठी, योजनांसाठी आधार कार्ड गरजेचे झाले आहे. लहान मुलांचा जन्म दाखला घेतात, परंतू आता आधार कार्डाचीही मागणी केली जाते. मग अशावेळी पालकांची धावपळ उडते.
सध्या लहान मुलांचे आधारकार्ड ज्युनिअर केजी, बालवाडीपासून शाळेमध्ये द्यावे लागते. पण एवढ्या लहान मुलांचे हाताचे ठसे कसे घेणार? असा प्रश्न पडला असेल ना. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की नवजात बालकांचेही आधारकार्ड काढता येते. मात्र, याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. कशी ती जाणून घ्या.
आज अनेक सरकारी कामांसाठी, योजनांसाठी आधार कार्ड गरजेचे झाले आहे. लहान मुलांचा जन्म दाखला घेतात, परंतू आता आधार कार्डाचीही मागणी केली जाते. मुलांच्या शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड मागितले जाते. अशावेळी पालकांची धावाधाव होते. पण शाळा तीन वर्षांनी सुरू होते. यामुळे जन्मताच आधार कार्ड काढण्याची सोय युआयडीएआयने केलेली आहे.
सध्या जन्मल्यानंतर पहिल्याच आठवड्यात आधार नोंदणी करता येते. यासाठी काही कागदपत्रे लागतात. जवळच्या पोस्टात किंवा नोंदणी कार्यालय़ात गेल्यानंतर मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि पालकांची म्हणजेच आई किंवा वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रीक ठसे घेतले जात नाहीत. यामुळे त्यांना त्यांच्या पालकांच्या आधार कार्डशी जोडले जाते. यानंतर त्यांना आधार नंबर दिला जातो. मूल 5 वर्षांचे झाल्यास त्याच्या बोटांचे ठसे, रेटीना स्कॅन आणि फोटो घेतले जातात.
मस्तच...! फक्त 50 रुपयांत Aadhaar मध्ये हवे तेवढे बदल करा
आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा
नव्या बॉन्डपटात Land Rover द्वारे चित्तथरारक स्टंट; पाहा 'ती' आहे तरी कोण...
न पाहिले कधी! स्कूटरलाही आला रिव्हर्स गिअर; पियाजिओची करामत
Video: पेट्रोल पंपावर कारचा दरवाजा कधीच उघडू नका; वाचा कारण
5 ते 15 वर्षांच्या मुलांचे काय करावे लागते?
आधार नोंदणी केंद्रावर गेल्यावर तेथे तुमच्या कागदपत्रांसह आधार नोंदणी क्रमांक द्यावा लागतो. बायोमेट्रीक घेतल्यानंतर रिसिप्ट दिली जाते. यानंतर 90 दिवसांत आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठविले जाते. जेव्हा मूल 15 वर्षांचे होते तेव्हा पुन्हा युआयडीएआयच्या डेटाबेसमध्ये पुन्हा त्याचे बायोमेट्रीक डेटा अपडेट करावा लागतो. यासाठी त्याच्या आधार क्रमांकाची प्रत आणि मुलाचे केंद्रात उपस्थित राहणे पुरेसे असते.
लहान मुलांच्या आधार नोंदणीसाठी तुम्ही ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊ शकता...इथे क्लिक करा
#AadhaarForMyChild
— Aadhaar (@UIDAI) February 7, 2020
Everyone can enrol for Aadhaar - even a new born child. All you need is the child's birth certificate and Aadhaar of one of the parents. Book appointment from: https://t.co/QFcNEqehlPpic.twitter.com/0Ncvr6XCKD