ओळखपत्र किंवा कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळेल आधार कार्ड; जाणून घ्या कसे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 09:37 AM2019-12-24T09:37:14+5:302019-12-24T09:37:42+5:30
बँकेत खाते उघडण्य़ासाठी, आयकर भरण्यासाठी किंवा अन्य सरकारी कामे करण्यासाठी आधार कार्ड, कागदपत्रे मागण्यात येतात.
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड एक महत्वाचे कागदपत्र बनले आहे. जवळपास प्रत्येक ठिकाणी याची गरज पडू शकते. 12 अंकी असलेल्या आधार कार्डला युआयडीएआय जारी करते. यासाठी तुमचे कागदपत्र, फिंगरप्रिंट लागत होते. काही वर्षांपूर्वी तर तासंतास आधार नोंदणी करण्यासाठी रांगा लावाव्या लागत होत्या.
बँकेत खाते उघडण्य़ासाठी, आयकर भरण्यासाठी किंवा अन्य सरकारी कामे करण्यासाठी आधार कार्ड, कागदपत्रे मागण्यात येतात. मात्र, आधार कार्डच काढण्यासाठी कागदपत्रे लागणार नसतील तर? कसे शक्य आहे. होय हे शक्य आहे. कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र सारख्या कागदपत्रांशिवाय आधार कार्ड बनविता येते.
यासाठी केवळ एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार कार्ड तुम्हाला घ्यावे लागेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्वात मोठ्या सदस्याचे आधार कार्ड घेवून आधारसाठी अर्ज करू शकता. विना आयडी किंवा पत्त्याच्या कागदपत्राशिवाय कुटुंब प्रमुखासोबतच्या नात्याचे कागदपत्र गरजेचे असते. जर असा कागदपत्र उपलब्ध जाला नाही तर आधार बनविण्यासाठी कोणतीही समस्या येणार नाही. आधार केंद्रावर हजर असलेल्या परिचयाच्या व्यक्तीची मदत घेऊ शकता.
अर्जदाराला त्याच्या कुटुंबप्रमुखासोबतच्या नातेसंबंधासाठी काही कागदपत्रे लागतात. यामध्ये MNREGA Job Card, PDS card, Pension Card, Army Canteen Card, CGHS/State Government/ECHS/ESIC Medical card, Passport असे कागदपत्र आहेत. जर तुमचे आधार कार्ड हरवले असले तरीही तुम्ही ते परत मिळवू शकता.