अट मान्य करा, अन्यथा व्हॉट्सॲप सोडा; कंपनी ठाम, युझर्सना १५ मेपर्यंतची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 02:31 AM2021-02-24T02:31:14+5:302021-02-24T06:41:27+5:30

जानेवारी महिन्यात व्हॉट्सॲपने नवीन गोपनीयता धोरणाची घोषणा केली.

Accept the condition, otherwise leave WhatsApp; Company firm, users up to 15th May | अट मान्य करा, अन्यथा व्हॉट्सॲप सोडा; कंपनी ठाम, युझर्सना १५ मेपर्यंतची मुदत

अट मान्य करा, अन्यथा व्हॉट्सॲप सोडा; कंपनी ठाम, युझर्सना १५ मेपर्यंतची मुदत

Next

नवी दिल्ली : गोपनीयतेसंदर्भातील धोरणात (प्रायव्हसी पॉलिसी) बदल करण्याच्या भूमिकेवरून युझर्सची नाराजी ओढवून घेतलेल्या व्हॉट्सॲपने अखेर आपलेच घोडे पुढे दामटले आहे. युझर्सना पसंत असो वा नसो गोपनीयता धोरणातील बदल त्यांना स्वीकारावे लागतील. जे युझर्स त्यास सहमती दर्शवणार नाहीत त्यांना बाहेरचे रस्ते मोकळे आहेत, असेच व्हॉट्सॲपने अप्रत्यक्षरीत्या सुचवले आहे. जानेवारी महिन्यात व्हॉट्सॲपने नवीन गोपनीयता धोरणाची घोषणा केली. त्याची १५ मेपासून सुरुवात होणार आहे.

काय आहे  व्हॉट्सॲपचे धोरण

युझर्सना व्यक्तिगत माहिती संकलित करण्याची परवानगी व्हॉट्सॲपला देणे बंधनकारक ठरणार.

ही व्यक्तिगत माहिती व्हॉट्सॲप तिची पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकला देणार आहे.

फेसबुक या माहितीचा वापर व्यवसायवृद्धीसाठी करणार.

१५ मेनंतर काय?

पॉलिसीचा स्वीकार न केल्यास त्यांना ठरावीक कालावधीनंतर तुमच्या अकाउंटवर गंडांतर येईल.

काही आठवडे युझर्सचे अकाऊंट सुरू राहील. त्यांना कॉल्स आणि नोटिफिकेशन्स येत राहतील. मेसेज वाचता वा पाठवता येणार नाहीत.

कालांतराने युझर्सना व्हॉट्सॲप अकाऊंट वापरता येणार नाही.

येत्या काही दिवसांत कॅम्पेन

जनजागृती करण्यासाठी दोन आठवड्यांत कॅम्पेनिंग सुरू करणार आहे. युझर्सना त्यांच्या व्हॉट्सॲप चॅट विंडोवर एक छोटा बॅनर दिसेल. त्यावर धोरणात काय बदल होणार आहे आणि युझर्सची किती माहिती व्हॉट्सॲप संकलित करणार आहे, याचा तपशील दिलेला असेल. बॅनरवरील तपशील वाचण्यासाठी युझर्सना ‘टॅप टू रिव्ह्यू’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. धोरणातील अटी व शर्ती स्वीकारण्याची वारंवार युझर्सना आठवण करून दिली जाईल.

Web Title: Accept the condition, otherwise leave WhatsApp; Company firm, users up to 15th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.