तुमच्या Smartphone चा रंग सांगतो तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही...
By सिद्धेश जाधव | Published: April 11, 2022 06:01 PM2022-04-11T18:01:22+5:302022-04-11T18:01:35+5:30
तुमच्या स्मार्टफोनच्या रंगावरून तुमच्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळू शकते. तुमचा स्वभाव कसा आहे हे मोबाईलच्या रंगावरून सांगता येतं.
तुम्ही स्मार्टफोन विकत घेण्याआधी त्याचा रंग कोणता असावा हे ठरवता का? कारण तुमच्या मोबाईलच्या रंग तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतो. अनेकजण स्मार्टफोनकडे फक्त संपर्क साधण्याचं साधन म्हणून बघतात. तर अशा लोकांची संख्या देखील जास्त आहे, जे रंगीत स्मार्टफोन घेणं पसंत करतात. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्या देखील नवनवीन रंग असलेले मॉडेल्स सादर करत आहेत.
कलर सायकॉलॉजिस्ट मॅथ्यू यांनी एका ब्लॉग पोस्टमधून एखाद्या व्यक्तीच्या स्मार्टफोनचा रंग त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगतो, याचा उलगडा केला आहे. चला जाणून घेऊया प्रत्येक रंगामागील अर्थ.
Black
मैथ्यूनुसार, काळ्या रंगाचा स्मार्टफोन मुद्दामहून विकत घेणाऱ्या लोकांमध्ये गूढता, गंभीरता, पावर आणि प्रोफेशनलिज्म, हे गुण असू शकतात. काळ्या रंगाचा स्मार्टफोन घेणारे लोकांचा प्रायव्हसीमध्ये विश्वास असतो. तसेच कठीण काळाचा चांगल्यापद्धतीने सामना करण्याची क्षमता त्यांच्यात असते.
White
सफेद रंग साफ सफाईची आवड दर्शवतो. हे लोक कोणाला जज करत नाहीत आणि लोकांचं म्हणणं खुल्या मनानं ऐकून घेतात. सफेद रंग शांतीचं प्रतीक आहे, जो या लोकांचा स्वभाव देखील असू शकतो. यांचा दर्जा देखील खूप उंच असू शकतो.
Blue
निळ्या रंगाच्या स्मार्टफोनच्या मालकांना चर्चेचा विषय बनायचं नसतं. हे लोक शांत स्वभावाचे असून खूप चिंतन करतात. आयुष्याचे निर्णय सावधानतापूर्वक आणि खूप विचार करून घेतात. हे जगावेगळा विचार करतात आणि कलात्मक विचार करू शकतात.
Red
लाल रंगाचे स्मार्टफोन खूप कमी उपलब्ध आहेत. लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याची सवय लाल रंगच्या फोन मालकांना असू शकते. यांना जास्त बोलायला आवडतं. तसेच वासना, आक्रमकता, घाई आणि स्पर्धात्मकता हे गुण देखील दिसू शकतात.
Gold
सोनेरी रंगाचा स्मार्टफोन वापरणारे लोक खूप दयाळू असतात. तसेच यांना पैसे, संपत्ती यावर देखील प्रेम असतं. आपली कमाई आणि समाजातील आपलं स्थान यावर त्यांचं लक्ष असतं. आपल्या भोवतालच्या लोकांना आपल्या यशाची आणि संपत्तीची जाणीव असावी, असं त्यांना वाटतं. मैथ्यूनुसार, सोनेरी रंगाचा फोन वापरणाऱ्या लोकांना चैनीच्या वस्तूंची आवड असते.