Unisoc प्रोसेसरचा फोन वापरणाऱ्या युजर्ससाठी धोक्याची घंटा; स्वस्त फोन्स पडणार महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 06:51 PM2022-06-03T18:51:19+5:302022-06-03T18:51:27+5:30
Unisoc चिपसेट असलेला फोन्समध्ये काही क्रिटिकल बग्स सापडले आहेत त्यामुळे युजर्सचं मोठं नुकसान होऊ शकतं.
Unisoc हे नाव अलीकडे जास्त प्रसिद्ध झालं आहे. स्मार्टफोन्स निर्माता कंपन्यांचे प्रोसेसर वगळता मीडियाटेक आणि क्वॉलकॉम या दोन प्रमुख कंपन्या चिपसेट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत चिपसेट शॉर्टेजमुळे बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन्ससाठी कंपन्यांनी Unisoc चे प्रोसेसर वापरण्यास सुरुवात केली आहे. आता एका रिपोर्टमधून समजले आहे की, चिनी कंपनी Unisoc चे चिपसेट असलेल्या स्मार्टफोन्समध्ये क्रिटिकल सिक्योरिटी बग्स आहेत, ज्यांच्यामुळे युजर्सचं मोठं नुकसान होऊ शकतं.
याआधी देखील सूचना देण्यात आली होती
चेक पॉईंट रिसर्चच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, Unisoc चिपसेट असलेल्या स्मार्टफोन्समध्ये सुरक्षेसंबंधित अनेक त्रुटी आहेत. चेक पॉईंट सॉफ्टवेयरचे सिक्योरिटी रिसर्च Slava Makkaveev यांनी सांगितले की, या बग्सचा वापर करून युजर्सना नुकसान पोहोचवण्यासाठी अटॅकर रेडियो स्टेशनचा वापर करू शकतात. हे दोष सर्वप्रथम Unisoc T700 चिपसेटवर चालणाऱ्या Motorola Moto G20 मध्ये दिसून आले होते. तसेच Unisoc चिपसेटच्या अन्य डिवाइसवर देखील या सिक्योरिटी प्रॉब्लम्सचा सामना करावा लागला आहे.
चेक पॉईंट रिसर्चच्या तज्ज्ञांनी या प्रॉब्लम्स आणि बग्सची माहिती मे 2022 मध्ये देखील कंपनीला दिली होती. आता या चिरीनी कंपनीनं या समस्या मान्य केल्या आहेत आणि लवकरच हे फिक्स करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. कंपनी लवकरच एक सिक्योरिटी पॅच रिलीज करेल, त्यामुळे डिवाइसमधील बग्स दूर केले जाईल, अशी अपेक्षा रिसर्चर्सनी व्यक्त केली आहे.