Acer Aspire 7 लॅपटॉपमध्ये नवा इंटेल प्रोसेसर; 32GB रॅम आणि 2TB स्टोरेजची ताकद
By सिद्धेश जाधव | Published: June 28, 2022 12:50 PM2022-06-28T12:50:36+5:302022-06-28T12:50:47+5:30
12th-generation Intel Core प्रोसेसरसह Acer Aspire 7 लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे.
Acer नं आपल्या लॅपटॉप लाईनअपमध्ये नव्या डिवाइसची भर टाकली आहे. 12th-generation Intel Core प्रोसेसरसह Acer Aspire 7 लॅपटॉप भारतात लाँच केला आहे. हा लॅपटॉप गेमिंग, डिझाईनिंग आणि कंटेंट क्रिएटर्सचा विचार करून या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे. फीचर्स पॅक्ड लॅपटॉपचं वजन मात्र कमी ठेवण्यात आलं आहे.
Acer Aspire 7 ची किंमत
Acer Aspire 7 ची किंमत 62,990 रुपयांपासून सुरु होते. या डिवाइसची खरेदी Acer Online Store आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून करता येईल. या लॅपटॉपचा फक्त एकच ब्लॅक व्हेरिएंट भारतात आला आहे. यासोबत एक वर्षाची वॉरंटी आणि 1 महिन्याचं एक्सबॉक्स गेम पास सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.
Acer Aspire 7 चे स्पेसिफिकेशन्स
Acer Aspire 7 मध्ये 12th-generation Intel Core i5 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत Nvidia GeForce GTX 1650 ग्राफिक्स देण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 RAM आणि 512GB PCIe Gen3 SSD स्टोरेज देण्यात आली आहे. रॅम 32GB पर्यंत वाढवता येतो. या लॅपटॉपमध्ये 50Wh बॅटरी 135W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
या लॅपटॉप 15.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले Full-HD 1920 x 1080 पिक्सल) रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. जो 81.67% स्क्रीन-टू-बॉडी रेश्योसह येतो. या पॅनलमध्ये Acer ब्लू लाईट शील्ड आणि Acer ExaColor टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6 आणि 6E सपोर्ट मिळतो. सोबत Bluetooth 5.2 आणि Thunderbolt 4 असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देखील देण्यात आले आहेत.