Intel प्रोसेसरसह आला Acer चा दमदार लॅपटॉप; रिसायकल्ड प्लास्टिकपासून बनलाय Aspire Vero
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 03:17 PM2021-12-10T15:17:15+5:302021-12-10T15:17:40+5:30
Acer Aspire Vero लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे, जो 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेजसह येतो. यात मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 मिळतो.
Acer नं आपला नवा लॅपटॉप भारतात लाँच केला आहे. कंपनीनं Aspire Vero लॅपटॉपमध्ये 30 टक्के रिसायकल्ड प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात 11th-Gen Intel Core प्रोसेसर, 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेज देण्यात आली आहे. हा लॅपटॉप ऑनलाईन तसेच ऑफलाईन मार्केटमधून विकत घेता येईल.
Acer Aspire Vero चे स्पेसिफिकेशन्स
Aspire Vero मध्ये 15.6-इंचाचा फुलएचडी (1,920×1,080 पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. या लॅपटॉपमध्ये 4.50GHz स्पीड असलेला क्वॉड-कोर Intel Core i5-1155G7 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीनं यात Intel Iris Xe ग्राफिक्स सपोर्ट दिला आहे. त्याला 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. या लॅपटॉपचा रॅम 12GB पर्यंत वाढवता येतो, असं कंपनीनं सांगितलं आहे.
या लॅपटॉपमध्ये HD (720p) वेबकॅम देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या एसर लॅपटॉपमध्ये विंडोज हेलो कॉम्पॅटिबल फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. यातील बॅकलिट कीबोर्ड अंधारात देखील लॅपटॉप वापरण्यास मदत करतो. लॅपटॉपमधील 48Wh ची बॅटरी 10 तासांचा बॅटरी बॅकअप देते. ही बॅटरी 65W स्पीडनं चार्ज करता येईल. कनेक्टिविटीसाठी यात Wi-Fi 6, ब्लूटूथ v5.1, एक HDMI पोर्ट, एक USB 3.1 पोर्ट, एक USB 3.2 पोर्ट, एक USB टाइप-सी पोर्ट आणि एक USB 2.0 पोर्ट मिळेल.
Acer Aspire Vero price in India
Acer Aspire Vero ची किंमत 79,999 रुपयांपासून सुरु होते. या पॅकेजमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 आणि एसरचं एक वर्षांचं एक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शन मिळेल. हा लॅपटॉप वॉलकॅनो ग्रे कलरमध्ये एसर ऑनलाईन स्टोर, एसर एक्सक्लूसिव स्टोर आणि ऑफलाईन स्टोरवरून देखील विकत घेता येईल.