एसरचा मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट

By शेखर पाटील | Published: December 11, 2017 10:34 PM2017-12-11T22:34:31+5:302017-12-11T22:35:52+5:30

एसरने विंडोज प्रणालीसाठी आपला पहिला मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट सादर केला असून, यात आभासी आणि विस्तारीत म्हणजे व्हर्च्युअल आणि ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीतील अनुभूती घेता येणार आहे.

Acer Mixed Reality Headset | एसरचा मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट

एसरचा मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट

Next

एसरने विंडोज प्रणालीसाठी आपला पहिला मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट सादर केला असून, यात आभासी आणि विस्तारीत म्हणजे व्हर्च्युअल आणि ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीतील अनुभूती घेता येणार आहे. सध्या व्हर्च्युअल तसेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीची मिश्र अनुभुती घेण्यासाठी काही हेडसेट बाजारपेठेत दाखल झाले आहेत. 

यात डेल, असुस, एचपी, मायक्रोसॉफ्ट, लेनोव्हो आदी कंपन्यांचे हेडसेट उपलब्ध आहेत. आता यात एसर कंपनीच्या मॉडेलची भर पडली आहे. याचे नाव ‘एसर विंडोज मिक्स्ड रिअ‍ॅलिटी’ असे असेल. कंपनीने बंगळुरू शहरातील आपल्या ‘प्रिडेटर लीग इव्हेंट’मध्ये याची घोषणा केली. यात वैश्‍विक पातळीवर मान्यताप्राप्त असणार्‍या ‘६ डिग्रीज ऑफ फ्रिडम’ (६डीओएफ) या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. तसेच याच्यासोबत १३ फूट लांबीची वायर देण्यात आली असून यामुळे युजरला मोकळेपणाने याचा वापर करता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

‘एसर विंडोज मिक्स्ड रिअ‍ॅलिटी’ या हेडफोन मॉडेलमध्ये दोन्ही डोळ्यांसाठी प्रत्येकी ९५ अंशातील व्ह्यू असणारा, २.८९ इंच आकारमानाचा आणि १४४० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने युजरला २८८० बाय १४४० पिक्सल्स म्हणजेच अल्ट्रा हाय डेफिनेशनची अनुभुती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हा हेडसेट परिधान करताना युजरला आरामदायी वाटेल याची काळजी घेण्यात आली आहे. अर्थात तो वजनाने हलका आणि वापरण्यासाठी सुलभ असाच आहे. एचडीएमआय २.०च्या मदतीने हा हेडसेट संगणकाला कनेक्ट करणे शक्य आहे. या हेडसेटचे मूल्य आणि याच्या उपलब्धतेबाबत मात्र सध्या तरी माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, सध्या हे मॉडेल अमेरिकेत ३९९ डॉलर्सला मिळत आहे. याचा विचार करता हा हेडसेट १५ हजारांपेक्षा जास्त मूल्यात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

Web Title: Acer Mixed Reality Headset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.