एसरचा न्युट्रो गेमिंग लॅपटॉप; १६ जीबी रॅम, विंडोज १० प्रणाली

By शेखर पाटील | Published: August 1, 2017 02:23 PM2017-08-01T14:23:34+5:302017-08-01T14:23:59+5:30

एयर कंपनीने न्युट्रो हा गेमिंग लॅपटॉप भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Acer's Neutro Gaming Laptop; 16 GB RAM, Windows 10 system | एसरचा न्युट्रो गेमिंग लॅपटॉप; १६ जीबी रॅम, विंडोज १० प्रणाली

एसरचा न्युट्रो गेमिंग लॅपटॉप; १६ जीबी रॅम, विंडोज १० प्रणाली

Next

एयर कंपनीने न्युट्रो हा गेमिंग लॅपटॉप भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

भारतात अनेक कंपन्या खास गेमर्सला डोळ्यासमोर ठेवून लॅपटॉप सादर करत आहेत. यात आता एसर न्युट्रो या गेमिंग मॉडेलची भर पडली आहे. गेमर्सला उच्च दर्जाचे ग्राफीक्स आणि चांगल्या रेझोल्युशनचा डिस्प्ले आवश्यक असतो. याचा विचार करता एसर न्युट्रो गेमिंग लॅपटॉप या मॉडेलमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल हाय डेफिनेशन म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याला चार जीबी रॅम असणार्‍या एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५०/१०५०टीआय या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली आहे. यामुळे या डिस्प्लेवर कोणताही हाय ग्राफीक्स असणारा गेम सहजपणे खेळता येतो. किंबहुना कोणत्याही गेमची खर्‍या अर्थाने मजा लुटता येते.  दर्जेदार ध्वनी हादेखील उत्कृष्ट गेमिंग लॅपटॉप मॉडेलचा अविभाज्य घटक असतो. याचा विचार करता एसर न्युट्रो गेमिंग लॅपटॉप या मॉडेलमध्ये डॉल्बीची ऑडिओ प्रिमीयम तर एसरच्या ट्रु हार्मनी या दोन प्रणालींचा मिलाफ असणारी ध्वनी प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाचा आणि सुश्राव्य अशा ध्वनीची अनुभुती घेता येते. अर्थात विविध गेम्सच्या आनंदात यामुळे भर पडते हे निश्‍चित. 

एसर न्युट्रो गेमिंग लॅपटॉप या मॉडेलमध्ये इंटेलचा सातव्या पिढीतला कोअर आय-७ हा अतिशय वेगवान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम १६ जीबी तर स्टोअरेजसाठी एक टेराबाईटपर्यंतचे पर्याय असतील. हा लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असेल. एसर न्युट्रो गेमिंग लॅपटॉप हे मॉडेल फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलसह देशभरातील एसर स्टोअर्समधून भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले असून याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ७५९९० रूपयांपासून सुरू होणारे आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फायच्या सुविधेसह एक युएसबी ३.१ टाईप-सी पोर्ट, एक युएसबी ३.० पोर्ट, दोन युएसबी २.० पोर्ट तर एक एचडीएमआय २.० पोर्ट प्रदान करण्यात आले आहेत. 

Web Title: Acer's Neutro Gaming Laptop; 16 GB RAM, Windows 10 system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.