डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 12:11 PM2020-09-15T12:11:26+5:302020-09-15T12:16:06+5:30
जगभरातील जवळपास 70 वेबसाईट्स हॅक करण्यासाठी मार्केटिंग कंपनी Mailfire ने विकसित केलेलं सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. याचवेळी डेटिंग वेबसाईट आणि ई-कॉमर्स वेबसाईटचा वापरही केला जातो. जर तुम्ही डेटिंग वेबसाईटचा वापर करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे कारण याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डेटिंग वेबसाईट्सद्वारे हॅकर्सनी लाखो युजर्सचा डेटा चोरल्याची घटना समोर आली आहे. vpnMentor च्या एक रिपोर्टनुसार, वेबसाईट्सच्या एक लाखांहून अधिक युजर्सचा डेटा हा हॅकर्सच्या हाती लागला आहे.
जगभरातील जवळपास 70 वेबसाईट्स हॅक करण्यासाठी मार्केटिंग कंपनी Mailfire ने विकसित केलेलं सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अनसिक्यॉर्ड इलास्टिसर्च सर्व्हरच्या माध्यमातून हा डेटा लीक करण्यात आला आहे. त्यामुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ब्लॅकमेलिंग आणि फ्रॉडचा धोका वाढला आहे. 882.1GB डेटा लीक झाला आहे. यामध्ये नोटिफिकेशन कॉन्टेंट, PII डेटा, प्रायवेट मेसेज, ऑथेंटिकेशन टोकन आणि लिंकसोबतच ईमेल कॉन्टेंटचा देखील समावेश आहे.
'या' देशांतील युजर्सना बसला मोठा फटका
रिसर्चर्सना हा डेटा लीक झाला याबाबत 31 ऑगस्टला माहिती मिळाली होती. 3 सप्टेंबर रोजी वेंडर्सबरोबर संपर्क केला आणि मेलफायरने सर्व्हर सुरक्षित केल्यानंतर डेटा लीकवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर युजर्सना देखील डेटा लीक झाल्याची माहिती दिली आहे. मेलफायरने याची जबाबदारी घेतली असून मोठा डेटा हॅक केल्याची माहिती मिळते आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, यूके, अमेरिका या देशांसह अन्य काही देशांतील युजर्सना याचा मोठा फटका बसला आहे.
गुगलने आणलं खास फीचर, कोण आणि का करतंय कॉल? हे देखील समजणारhttps://t.co/QNK8UB318W#Google#technology
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2020
लीक झालेल्या डेटामध्ये युजर्सची महत्त्वाची माहिती
लीक झालेल्या PII डेटामध्ये युजर्सचं पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, ईमेल, लोकेशन, अपलोड करण्यात आलेले प्रोफाईल फोटो आणि इतर खासगी तपशील यांचा समावेश आहे. हॅकर्सना ही सर्व माहिती मिळाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगल प्ले स्टोरवरून जुलै आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान 17 धोकादायक अॅप्स हटवले आहेत. हे अॅप्स मेलवेयर इन्फेक्टेड होते. जुलैमध्ये टेक दिग्गजने प्ले स्टोरवरून 11 आणि काही दिवसांपूर्वी 6 अॅप्सवर बंदी घातली होती. आता गुगल वर हे 17 अॅप्स उपलब्ध नाहीत. या अॅप्सना डाऊनलोड करता येत नाही.
अलर्ट! तुमच्या फोनमध्ये 'हे' Apps असतील तर वेळीच व्हा सावधhttps://t.co/ksbzaQGFlS#Google#Technology
— Lokmat (@MiLOKMAT) September 12, 2020
गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अॅप्स, फोनमधून करा डिलीट नाहीतर...
प्ले स्टोरवरून ज्या 17 अॅप्सना हटवण्यात आले असून ते सर्व जोकर नावाचे मेलवेयरच्या एका नवीन व्हेरियंटशी अफेक्टेड होते. Check Point च्या रिसर्चने जुलैमध्ये या मेलवेयर अॅप्सला शोधून काढले होते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गुगल 2017 पासून या अॅप्सला ट्रॅक करीत होते. 11 अॅप्सला प्ले स्टोरवरून हटवल्यानंतर Joker मेलवेयर एका नव्या रुपात गुगल प्ले स्टोरवरून 6 दुसऱ्या अॅप्स म्हणून कार्यरत होते. आता या 6 अॅप्सना सुद्धा प्ले स्टोरवरून हटवले आहे. सायबर सिक्योरिटी फर्म Pradeo च्या माहितीनुसार, जवळपास 2 लाख वेळा हे 6 अॅप्स प्ले स्टोरवरून डाऊनलोड करण्यात आले आहे.
भारीच! WhatsApp चे 'हे' कमाल फीचर्स जाणून घ्या अन् चॅटिंग आणखी मजेशीर कराhttps://t.co/kajAMJpsqq#WhatsApp#technology
— Lokmat (@MiLOKMAT) September 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी
जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...
"मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय"
"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"