रेडमी-रियलमीची जागा घेण्याची तयारी? बजेट Motorola चा नवा फाडू 5G Smartphone लाँच
By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2022 12:02 PM2022-06-09T12:02:15+5:302022-06-09T12:02:56+5:30
Motorola नं आपला नवा 5G स्मार्टफोन Moto G62 5G 50MP कॅमेरा आणि 5,000Ah च्या बॅटरीसह लाँच केला आहे.
Motorola सध्या थांबायचं नाव घेत नाही, कंपनीनं लागोपाठ डिवाइस लाँच करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. भारतात स्वस्त 5G स्मार्टफोन Moto G82 लाँच केल्यानंतर आता कंपनीनं ब्राजीलमध्ये किफायतशीर Moto G62 5G स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्यात स्नॅपड्रॅगन 4-सीरीज चिप, 120Hz डिस्प्ले, 50-मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 5,000Ah ची बॅटरी देण्यात आली आहे.
Moto G62 5G ची किंमत
Motorola नं अजूनतरी Moto G62 5G च्या किंमतीची माहिती दिली नाही. तसेच हा हँडसेट कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल ही माहिती डॆहील गुलदस्त्यात आहे. फीचर्स आणि स्पेक्स पाहता याची किंमत मिडरेंजमध्ये असू शकते. हा ग्रॅफाइट आणि ग्रीन या दोन रंगात विकत घेता येईल.
Moto G62 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G62 5G मध्ये 6.5-इंचाचा IPS पॅनल देण्यात आला आहे, जो FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेमधील पंच-होल मध्ये 16MP चा सेल्फी शुटर मिळतो. तर मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. जो 118-डिग्री FOV असेलल्या 8MP अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेऱ्यासह येतो.
Moto G62 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे, जी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो. फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित MyuX वर चालतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. यात 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 20W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.