स्वस्त आणि मस्त Realme टॅबलेटची होणार भारतात एंट्री; 6400mAh ची बॅटरी टिकेल दिवसभर

By सिद्धेश जाधव | Published: April 16, 2022 07:58 PM2022-04-16T19:58:56+5:302022-04-16T19:59:20+5:30

Realme Pad Mini टॅबलेट लवकरच 6400mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग, Unisoc T616 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह भारतात येत आहे.  

Affordable Realme Pad Mini India Launch Soon Check Price And All Details  | स्वस्त आणि मस्त Realme टॅबलेटची होणार भारतात एंट्री; 6400mAh ची बॅटरी टिकेल दिवसभर

स्वस्त आणि मस्त Realme टॅबलेटची होणार भारतात एंट्री; 6400mAh ची बॅटरी टिकेल दिवसभर

Next

Realme सध्या स्मार्टफोन व्यतिरिक्त देखील अनेक डिवाइस सादर करत आहे. यात काही दिवसांपूर्वी आलेल्या Realme Pad चा देखील समावेश आहे, जो कंपनीचा सर्वात पहिला अँड्रॉइड टॅबलेट आहे. त्यानंतर कंपनीनं आणखी एक टॅबलेट Realme Pad Mini नावानं फिलिपिन्समध्ये सादर केला होता. जो आता लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे.  

टिपस्टर सुधांशुनं मायस्मार्टप्राईसला दिलेल्या माहितीनुसार रियलमी पॅड मिनी कंपनीच्या भारतीय वेबसाईटवर टॅबलेटच्या यादीत दिसला आहे. त्यामुळे लवकरच भारतात या टॅबलेटचं पदार्पण होऊ शकतं. तसेच या टॅबलेटची किंमत मूळ रियलमी पॅडपेक्षा कमी असेल. अर्थात Realme Pad Mini भारतात 14 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केला जाईल.  

Realme Pad Mini चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Pad Mini मध्ये 8.7-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1340 x 800 पिक्सल रेजलूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Unisoc T616 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB पर्यंत RAM आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.  

फोटोग्राफीसाठी या छोट्या टॅबमध्ये दोनच कॅमेरे मिळतात. त्यातील 8MP चा सेन्सर कंपनी टॅबच्या मागच्या बाजूस दिला आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा सेन्सर मिळतो. या टॅबलेटमध्ये 6400mAh मोठी बॅटरी मिळते, जी 18W फास्ट चार्जिंग स्पिडनं चार्ज करता येते. याचे वजन 372 ग्राम आहे. 

Web Title: Affordable Realme Pad Mini India Launch Soon Check Price And All Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.