मस्तच! टू स्टेप व्हेरिफिकेशननंतर ऑनलाईन सिक्योरिटीसाठी Google आणतंय फीचर, जाणून घ्या, खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:00 PM2022-02-15T19:00:52+5:302022-02-15T19:08:31+5:30

Google Online Security : गुगलने आपल्या युजर्सची अकाऊंट सिक्योरिटी अधिक स्ट्राँग केली आहे.

after 2 step verification google is bringing strong feature for online security know its specialty | मस्तच! टू स्टेप व्हेरिफिकेशननंतर ऑनलाईन सिक्योरिटीसाठी Google आणतंय फीचर, जाणून घ्या, खासियत

मस्तच! टू स्टेप व्हेरिफिकेशननंतर ऑनलाईन सिक्योरिटीसाठी Google आणतंय फीचर, जाणून घ्या, खासियत

Next

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हल्ली यामुळे होणाऱ्या फ्रॉडची संख्या देखील वाढली आहे. विविध मार्गांचा वापर करून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होत आहेत. खासगी डेटा चोरी झाल्यास नेमकं काय करावं हे अनेकांना माहीत नाही. ऑनलाइन शॉपिंग किंवा डिजिटल पेमेंट करताना अनेकदा लोकांची फसवणूक केली जाते. फ्रॉडच्या वाढत्या केसेस लक्षात घेऊन गुगलकडूनही (Google) युजर्सचे अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली जातात. टू स्टेप व्हेरिफिकेशननंतर आता Google ऑनलाईन सिक्योरिटीसाठी आणखी एक दमदार फीचर आणत आहे.

गुगलने आपल्या युजर्सची अकाऊंट सिक्योरिटी अधिक स्ट्राँग केली आहे. 2021 मध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two-Step Verification) फीचर सुरू करण्यात आलं होतं. ही गुगल अकाऊंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केल्यानंतर अकाऊंट हॅकिंग (Account Hacking) प्रकरणात 50 टक्क्यांची कमी आल्याचा दावा गुगलने केला आहे. गेल्या वर्षी जवळपास 150 मिलियनहून अधिक युजर्स टू-स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रियेशी जोडले गेले आहेत. यामुळे अकाऊंट हॅकिंग प्रकरणात 50 टक्क्यांची कमी आल्याचं गुगलने म्हटलं आहे.

आपल्या युजर्सच्या सुरक्षेत अधिक वाढ करण्यासाठी कंपनी आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे. आपल्या ब्लॉगमध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे. ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगल (Google) पुढील महिन्यापासून युजरला सेफ ब्राउझिंग फीचरचा (Safe Browsing) वापर करण्याचा पर्याय देणार आहे. यामुळे वेब आणि गुगल अकाउंटमध्ये येणाऱ्या थ्रेटपासून प्रोटेक्शन मिळेल. हे फीचर भारतात कधी लाँच होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

Google ने ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी मोफत ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी खान अकॅडमी या शैक्षणिक संस्थेशी हातमिळवणी केली आहे. गुगल यासाठी 50 लाख डॉलर्स देणार आहे, जेणेकरून खान अकॅडमी सहज समजेल असा ऑनलाईन कंटेंट तयार करू शकेल. Google वर आयडेंटिटी थेफ्ट कसं थांबवाल, हे सर्च 110 टक्क्यांनी वाढलं असल्याचं गुगलने म्हटलं आहे. लोक स्वत:ला ऑनलाईन सुरक्षित ठेवण्यासाठीचे पर्याय गुगलवर सर्च करत असल्याचं गुगलने म्हटलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: after 2 step verification google is bringing strong feature for online security know its specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.