Xiaomi चं Apple च्या पावलावर पाऊल; स्वस्त फोनमध्ये चार्जर नाही?, उद्या होणार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:59 PM2022-08-25T19:59:20+5:302022-08-25T20:01:16+5:30
Redmi Note 11SE Launch: Apple त्यांच्या फोनसह बॉक्समध्ये चार्जर देत नाही. आता Xiaomi देखील तेच करणार आहे. कंपनी उद्या एक नवीन बजेट फोन Redmi Note 11SE लाँच करत आहे.
Redmi Note 11SE Launch: स्मार्टफोन इंडस्ट्रीत मग ते डिव्हाईसचे डिझाईन असो किंवा एखाद्या कंपनीची पॉलिसी, अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. यापूर्वी एका कंपनीनं स्मार्टफोनच्या बॉक्समधून इयरफोन्स गायब केले. त्यानंतर अनेक कंपन्यांनी तोच मार्ग अवलंबला. Apple ने प्रथम 3.5mm ऑडिओ जॅक काढला, नंतर बॉक्समधून चार्जर काढून टाकला. आता अनेक कंपन्यांनी तेच करायला सुरुवात केली आहे.
सॅमसंगच्या अनेक बॉक्समध्ये तुम्हाला चार्जर मिळत नाही. अलीकडे, Realme ने देखील त्यांचा स्वस्त फोन Narzo 50A Prime च्या बॉक्समध्ये चार्जर दिला नव्हता आणि आता Xiaomi देखील तेच करण्याच्या तयारीत आहे. Redmi च्या आगामी फोन Redmi Note 11SE सह बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध होणार नाही. कंपनीची वेबसाइटवरून तरी असंच दिसत आहे. Redmi Note 11SE भारतात 26 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीच्या Note 11 सीरिजमधील हा नवा मोबाईल असेल.
बॉक्समध्ये काय?
अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, Redmi Note 11SE सह बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध होणार नाही. यामध्ये तुम्हाला फक्त फोन, चार्जिंग केबल, केस, सिम इजेक्टर टूल, क्विक गाइड आणि वॉरंटी कार्ड मिळेल. म्हणजेच, तुम्हाला बॉक्समध्ये चार्जिंग अडॅप्टर मिळणार नाही.
काय आहेत स्पेसिफिकेशन?
Redmi च्या या मोबाईलमध्ये 6.43-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. हँडसेटमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसरही मिळेल. याशिवाय फोनमध्ये 6GB रॅम आणि 8GB रॅमचा पर्याय मिळेल. तसेच यामध्ये 64GB आणि 128GB स्टोरेजचा पर्याय मिळेल. हा फोन Android 11 बेस्ड MIUI 12.5 सह लाँच केला जाऊ शकतो. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल, यातील मेन कॅमेरा 64MP चा असेल. याशिवाय फ्रन्ट कॅमेरा 13MP चा असेल. तसंच यात 5000mAh ची बॅटरी मिळणार असून यात 33W चं फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात येणार आहे.