iPhone नंतर आता Apple Airpod मेड इन इंडिया, १६५० कोटींचा प्लांट उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 04:16 PM2023-03-16T16:16:43+5:302023-03-16T16:17:54+5:30
iPhone बनवणाऱ्या Apple या कंपनीने चीनला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. आता Apple कंपनीने भारतात गुंतवणूक वाढवली आहे.
iPhone बनवणाऱ्या Apple या कंपनीने चीनला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. आता Apple कंपनीने भारतात गुंतवणूक वाढवली आहे. फॉक्सकॉनने पहिल्यांदा भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले. आता कंपनीने भारतातही एअरपॉड बनवण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी ते भारतात सुमारे १,६५० कोटी रुपये खर्चून प्लांट उभारणार आहे.
Foxconn ला Apple कडून Airpods बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. फॉक्सकॉनला एअरपॉड्स बनवण्याची ऑर्डर पहिल्यांदाच मिळाली आहे. सध्या, अनेक चीनी पुरवठादार कंपन्या Apple Airpods तयार करतात. आता हे काम फॉक्सकॉन कंपनीला मिळणार आहे.
फॉक्सकॉन एअरपॉड प्लांटवर २०० डॉलर मिलियन किंवा सुमारे १,६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. कंपनी भारतातील तेलंगणा राज्यात हा प्लांट उभारू शकते. मात्र, कंपनीला किती एअरपॉड बनवण्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Interconnect Technologies Limited या वर्षाच्या उत्तरार्धात तेलंगणात एअरपॉड निर्मितीसाठी प्लांट उभा करणार आहे. एअरपॉड्सचे उत्पादन २०२४ पर्यंत सुरू होऊ शकते.
एअरपॉड्स बनवण्याचा प्लांट भारतात उभा करण्यासाठी Apple कंपनीच इच्छुक आहे. फॉक्सकॉन या प्रकरल्पात मोठी गुंतवणूक करु शकते.