जिओला विसरा आता 'ही' कंपनी अनलिमिटेड कॉल्स देणार फ्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 02:53 PM2019-10-10T14:53:27+5:302019-10-10T14:58:52+5:30
दिवाळीआधी रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना दणका दिला आहे.
नवी दिल्ली - दिवाळीआधी रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना दणका दिला आहे. कॉल टर्मिनेशन चार्जशी संबंधीत नियमांमुळे जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे जिओ युजर्सना आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी ही सुविधा मोफत देण्यात आली होती. मात्र आता आणखी एका कंपनीने अनलिमिटेड कॉल फ्री देण्याची घोषणा केली आहे. व्होडाफोन-आयडिया आता आपल्या युजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे.
Vodafone Idea Limited (VIL) ने गुरुवारी (10 ऑक्टोबर) IUC संबंधीत एक मोठी घोषणा केली आहे. युजर्सना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस (IUC) लागणार नसल्याची माहिती व्होडाफोन-आयडियाने दिली आहे. कंपनीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा आनंद घ्या. व्होडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर फ्री कॉल' असं ट्वीट व्होडाफोनने केलं आहे.
Relax, there will be no charges on Vodafone calls to other networks. So keep enjoying what we promised you - truly free calls on Vodafone unlimited plans.
— Vodafone (@VodafoneIN) October 10, 2019
Spread the news and share this link with friends and family who wish to join Vodafone: https://t.co/qAlV1Sgvhrpic.twitter.com/fuMGdPq1ml
व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये सुरुवातीचा प्रीपेड प्लॅन 119 रुपयांचा आहे. 28 दिवस व्हॅलिडीटी, 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा या प्लॅनमध्ये मिळते. व्होडाफोनने आयडियाला विकत घेतल्याने जिओचा नंबर घसरला होता. व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या अहवालानुसार व्होडाफोन आयडियाने जुलै-ऑगस्टमध्ये जिओपेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत. 31 जुलै 2019 पर्यंत Vodafone Idea चे 38 कोटी अॅक्टिव्ह ग्राहक बनले आहेत. तर जिओचे 33.4 कोटी युजर्स आहेत. भारती एअरटेलकडे 32.9 कोटी युजर्स आहेत.
रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी खास ऑफर्स आणत असतं. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. जिओने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्सना आपल्या युजर्सद्वारे अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर मोबाईल फोन कॉल्ससाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हे चार्जेस युजर्सने दुसऱ्या जिओ युजर्सला कॉल केला असेल किंवा व्हॉट्सअॅप आणि अन्य प्लॅटफॉर्मवरून कॉल केल्यास लागू होणार नाहीत. 2017 मध्ये ट्रायने इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC) 14 पैशांवरून 6 पैसे प्रति मिनिट केले होते. तसेच जानेवारी 2020 मध्ये हे संपेल असं सांगितलं होतं. त्यानंतर आता जिओने आउटगोइंग कॉलसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं आहे.
जिओच्या कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे; जाणून घ्या, का आणि किती?https://t.co/yNt2fbgbKv#Jio
— Lokmat (@MiLOKMAT) October 9, 2019
जिओवरुन व्हाईस कॉलिंग सेवा मोफत देण्यात येत असल्याने कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या अर्थात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना ट्रायच्या नियमानुसार 13, 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागत होती. त्यामुळे आता जिओने ट्रायच्या नियमांपासून वाचण्यासाठी अन्य नेटवर्कवर कॉलिंग सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच इन्कमिग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र याची भरपाई कंपनी तेवढ्याच पैशात मोफत इंटरनेट डेटा देणार असल्याची माहिती जिओने दिली आहे.