दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार  

By सिद्धेश जाधव | Published: June 4, 2022 05:40 PM2022-06-04T17:40:20+5:302022-06-04T17:41:48+5:30

AGM Glory G1S स्मार्टफोन 8GB RAM, 5,500mAh बॅटरी आणि Snapdragon 480 5G प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे. 

AGM Glory G1S Rugged Smartphone Launched   | दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार  

दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार  

Next

रगड स्मार्टफोन ही कॅटेगरीमध्ये मजबूत स्मार्टफोन सादर केले जातात. हे फोन्स खास क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात येतात. त्यामुळे यात नाईट व्हिजन आणि थर्मल कॅमेरा सारखे सेन्सर मिळतात. सॅमसंग आणि नोकिया सोडले तर इतर प्रमुख कंपन्यांचे रगड स्मार्टफोन दिसले नाहीत. परंतु काही छोटे ब्रँड्स या कॅटेगरीमध्ये सक्रिय आहेत. अशाच एका AGM ब्रँड नवीन AGM Glory G1S नावाचा दमदार स्मार्टफोन सादर केला आहे.  

AGM Glory G1S चे स्पेसिफिकेशन्स 

AGM Glory G1S स्मार्टफोन कंपनीचा सर्वात हलका रगड स्मार्टफोन आहे. कंपनीनं यात 6.53-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे. प्रोसेसिंगसाठी क्वालकॉमचा Snapdragon 480 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8GB RAM आणि 128GB मेमरी मिळते. जी 512GB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील स्मार्टफोनमध्ये मिळतो.  

AGM Glory G1S स्मार्टफोनचा कॅमेरा सेटअप देखील खास आहे. फोनमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा मिळतो. सोबत 20MP चा नाईट व्हिजन कॅमेरा मिळतो, जो रात्री फोटो काढण्यास मदत करतो. तसेच फोनमध्ये थर्मल इमेजिंग आणि इंफ्रारेड कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन IP68, IP69K, आणि MIL-STD-810H रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. AGM Glory G1S स्मार्टफोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 24 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते.  

AGM Glory G1S ची किंमत 

AGM Glory G1S स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून मागवता येईल. परंतु सध्या हा स्मार्टफोन फक्त अमेरिकेत 699 डॉलर (सुमारे 54,300 रुपये) मध्ये विकला जात आहे.  

Web Title: AGM Glory G1S Rugged Smartphone Launched  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.