Strong Phone AGM Glory: गोठवणाऱ्या थंडीत देखील वापरता येईल 6200mAh बॅटरी असलेला हा दणकट फोन; 48MP कॅमेऱ्यासह AGM Glory 5G Phone लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 29, 2021 03:04 PM2021-10-29T15:04:02+5:302021-10-29T15:04:15+5:30

Strong Phone AGM Glory Price Details: AGM Glory हा रगेड स्मार्टफोन आहे. याची खासियत म्हणजे हा फोन -27° सेल्सियस तापमानात देखील बिनदिक्कत दिवसभर वापरता येईल.  

Agm glory Stong rugged phone launch with 6200mah battery 48mp main camera 8gb ram know price specification details  | Strong Phone AGM Glory: गोठवणाऱ्या थंडीत देखील वापरता येईल 6200mAh बॅटरी असलेला हा दणकट फोन; 48MP कॅमेऱ्यासह AGM Glory 5G Phone लाँच 

Strong Phone AGM Glory: गोठवणाऱ्या थंडीत देखील वापरता येईल 6200mAh बॅटरी असलेला हा दणकट फोन; 48MP कॅमेऱ्यासह AGM Glory 5G Phone लाँच 

Next

मजबूत फोन म्हटलं कि लोकांच्या डोळ्यासमोर जुने नोकिया फिचर फोन येतात. विशेष म्हणजे हल्ली सादर होणारे स्मार्टफोन्स देखील आधीच्या तुलनेत जास्त मजबूत झाले आहेत. परंतु Rugged Phone म्हणून एक कॅटेगरी आहे, ज्यात कंपन्या मिल्ट्री ग्रेड स्मार्टफोन सादर करतात. हे फोन्स मजबूत तर असतात परंतु अतिशय थंड किंवा उष्ण वातावरणात देखील वापरता येतात. आता AGM नावाच्या कंपनीने आपला AGM Glory नावाचा रगेड स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक 5G Phone आहे जो -27° सेल्सियस तापमानात देखील वापरता येतो.  

AGM Glory Price 

AGM Glory स्मार्टफोनची किंमत 399 डॉलर्स (सुमारे 30,00 रुपये) पासून सुरु होते. या फोनचे तीन व्हेरिएंट कंपनीने सादर केले आहेत. हा डिवाइस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल. विशेष म्हणजे भारतात देखील या मोबाईलची डिलिव्हरी करण्यात येईल, असे वेबसाईटवरून समजले आहे.  

AGM Glory Specifications 

AGM Glory मध्ये 6.53 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन लाक्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे, जो एक 5G प्रोसेसर आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते. हा फोन Android 11 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 20 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. हा मोबाईल 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. फोनमधील 6200 एमएएचची अवाढव्य बॅटरी सिंगल चार्जवर अनेक दिवसांचा बॅकअप देऊ शकते.  

AGM Glory मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, एफएम, वाय-फाय आणि 3.5mm ऑडियो जॅक इत्यादी कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स मिळतात. हा फोन आयपी68 सर्टिफाइड आहे, त्यामुळे हा फोन 1.5 मीटर पाण्यात देखील वापरता येईल. तसेच IP69K सर्टिफिकेशनमुळे याचे धुळीपासून संरक्षण होते. तर MIL-STD-810H रेटिंगचा अर्थ असा कि हा फोन 1.5 मीटर उंचीवरून पडल्यावर देखील सुरक्षित राहील.  

हा फोन थंड वातावरणात वापरण्यासाठी बनवण्यात आला आहे. म्हणून हा फोन -27° सेल्सियस तापमानात देखील दिवसभर चालेल. तर -30° सेल्सियस तापमान असल्यास 3 तासांचा बॅकअप मिळेल. -40° सेल्सियसवर बॅकअप 1 तासापर्यंत कमी होईल, असे कंपनीने सांगितले आहे.  

Web Title: Agm glory Stong rugged phone launch with 6200mah battery 48mp main camera 8gb ram know price specification details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.