AI CEO Robot : या कंपनीने AI रोबोटला बनवलं CEO; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ, अब्जावधीने वाढला व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 03:15 PM2023-03-16T15:15:15+5:302023-03-16T15:15:54+5:30

AI CEO Robot: तुम्ही आतापर्यंत कंपनीच्या CEO पदी एखादा व्यक्ती बसल्याचे ऐकले असेल, पण कंपनीने रोबोटला सीईओ बनवले आहे.

AI CEO Robot : china gaming company made an AI robot CEO; 10 percent increase in company shares, business increased by billions | AI CEO Robot : या कंपनीने AI रोबोटला बनवलं CEO; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ, अब्जावधीने वाढला व्यवसाय

AI CEO Robot : या कंपनीने AI रोबोटला बनवलं CEO; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ, अब्जावधीने वाढला व्यवसाय

googlenewsNext

गेल्या वर्षी ChatGPT या AI Bot ची जगाला ओळख झाली आणि तेव्हापासूनच याची जोरदार चर्चा सुरू आहे. लॉन्च झाल्यापासून या AI चॅटबॉटची लोकप्रियता वाढत चालली आहे. पण, एका कंपनीने हा चॅटबॉट येण्यापूर्वीच एका बॉटला आपला CEO बनवलं आहे. चीनमधील एका व्हिडिओ गेम कंपनीने हा कारनामा केला आहे.

चीनी गेमिंग कंपनी NetDragon Websoft ने हा मोठा निर्णय घेतला. कंपनीने ऑगस्टमध्ये घोषणा केली की, AI पॉवर्ड व्हर्च्युअल ह्यूमनॉइड रोबोट त्यांच्या सब्सिडियरी कंपनीचा CEO असेल. या रोबोटचे नाव Tang Yu आहे, जो Fujian NetDragon Websoft चा CEO आहे.

कंपनीचे शेअर वधारले
या निर्णयानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, Hang Seng इंडेक्सवर NetDragon च्या स्टॉकमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. असे नाही की, ही वाढ फक्त एका दिवसाची आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या सहा महिन्यांपासून 10 टक्के ग्रोथ झाली आहे. यासोबतच NetDragon ची व्हॅल्यू 1.1 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. 

कंपनीने काय म्हटले ?
NetDragon चे चेअरमन Dejian Liu ने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, 'आम्हाला विश्वास आहे की, कॉर्पोरेट मॅनेजमेंटचे भविष्य AI आहे. Tang Yu ला CEO बनवणे आमच्या कामाची कमिटमेंट आणि काम करण्याच्या पद्धतीला दर्शवतो.' दरम्यान, NetDragon ची सुरुवात 1999 मध्ये झाली होती. कंपनीने अनेक मल्टी-प्लेअर गेम्स बनवले आहेत. यात Eudemons Online, Heroes Evolved आणि Conquer Online सामील आहेत.
 

Web Title: AI CEO Robot : china gaming company made an AI robot CEO; 10 percent increase in company shares, business increased by billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.