एआयचा चष्मा दाखविणार अंधांना मार्ग! देशातील दीड कोटी अंधांना होणार मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 07:02 AM2024-01-09T07:02:21+5:302024-01-09T07:02:37+5:30
देश-विदेशातील ७१ भाषांमध्ये सक्षम
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आतापर्यंत अंधांना मार्गदर्शन करण्यासाठी काठीचा वापर केला जात होता. आता त्यांच्यासाठी स्मार्ट व्हिजन चष्मा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लासेस बनले आहेत. ते त्यांना प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करतील.
बिलासपूर सिम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, असे चष्मे चार वर्षांपूर्वी इस्रायल आणि अमेरिकेत बनवले गेले होते. भारतात याचा शोध दिल्लीतील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. राकेश जोशी यांनी उत्तम तंत्रज्ञान आणि कमी खर्चात लावला आहे. सहा महिन्यांपूर्वी देशात या ग्लासची निर्मिती सुरू झाली.
देश-विदेशातील ७१ भाषांमध्ये सक्षम
- इस्रायल आणि अमेरिकेत तयार होणाऱ्या चष्म्यांमध्ये ५ ते ८ भाषांना समावेश होता.
- डॉ. जोशींनी यात ७२ भाषा समाविष्ट केल्या आहेत. हे चष्मे मोबाइल ॲपद्वारे काम करतात.
- ४८ हजार रुपये किंमत डॉ. जोशी यांनी तयार केलेल्या चष्म्याची आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- ६.३० लाख रुपये किंमत अमेरिकन आणि इस्रायली चष्म्याची आहे. देशातील दीड कोटी अंधांसाठी हे चष्मे उपयुक्त ठरू शकतात.
- डॉ. जोशी यांच्या मते चष्मा ५ मोडवर काम करतो. यात पाच बटण आहेत. पहिले बटण दाबल्यावर चष्मासमोर काय आहे ते सांगेल.
- दुसरा म्हणजे वाचन मोड. बटण दाबल्यावर, चष्मा अंध व्यक्तीला पुस्तक, वर्तमानपत्र किंवा लिखित मजकूर वाचून दाखवेल.
- तिसरा म्हणजे चालण्याचा मोड. म्हणजेच तिसरे बटण दाबल्यावर तीन मीटरच्या अंतरात काय आहे याची माहिती मिळेल.
- चौथा मोड चेहरा ओळख आहे. याच्या मदतीने समोरची व्यक्ती कोण आहे हे कळेल.
- पाचवा मदत मोड आहे. एखादा अंध व्यक्ती कुठेतरी भटकली असेल तर तिचे स्थान कुटुंबीयांपर्यंत पोहोचते.