हवाई दलानं लाँच केला ´Air Combat Game´
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 02:59 PM2019-08-01T14:59:45+5:302019-08-01T15:03:54+5:30
हवाई दलाने याचा टीझर 20 जुलैलाच रिलीझ केला होता. टीझरमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना दाखवण्यात आले होते.
मुंबई: भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) Air Combat Game बुधवारी लाँच केला. हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांच्या हस्ते हा गेम लाँच करण्यात आला. हा गेम Android आणि iOS या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर खेळता येऊ शकतो.
हवाई दलाने याचा टीझर 20 जुलैलाच रिलीझ केला होता. टीझरमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना दाखवण्यात आले होते. तसेच या गेममध्ये युजर्स स्वत: पायलट असतील आणि विमानाचे सर्व कंट्रोल म्हणजेच ऑन-स्क्रीन बटन तुमच्याकडे असतील. तसेच गेमच्या सुरुवातीला ट्रेनिंग सेशन देखील आहे. यामध्ये एअरक्राफ्ट कसे चालवायचे याची माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडीओ गेम सध्या तरी एकच जण खेळू शकतो, पण लवकरच हा गेम एकाच वेळी अनेक जण खेळू शकतील, असा मल्टिप्लेअर मोड जोडला जाणार आहे. हा गेम केवळ मोबाईलसाठी तयार करण्यात आला आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. गेममध्ये प्रशिक्षण, सिंगल प्लेअर आणि फ्री फ्लाईटचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गेममध्ये राफेल विमानांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राफेल सोबतच सुखोई 30 MKI विमानांचाही समावेश आहे.
Launch of #IAF#MobileGame : Android / iOS version of IAF developed Mobile Game (Single Player) will be launched on 31 Jul 19. Download on your Android / iOS mobile phone & cherish the thrilling flying experience. The multiplayer version will soon follow. The Teaser of the game… pic.twitter.com/yhfOrOZxWV
— Indian Air Force (@IAF_MCC) July 20, 2019
काही महिन्यांपूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्ताननेही एफ - 16 विमानांनी हवाई हल्ला केला, पण भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ - 16 विमान पाडलं. या मोहिमेचा हिरो विंग कमांडर अभिनंदन ठरला होता. आता हवाई दलाने तयार केलेल्या या गेममुळे तुम्ही काल्पनिक मिग-21 विमान उडवू शकणार आहात.