Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 07:25 PM2024-12-03T19:25:10+5:302024-12-03T19:47:30+5:30

Airtel and Jio Recharge Plan : एअरटेलचा एक शानदार प्लॅन आहे.

Airtel and Jio Recharge Less Than 100 Rupees Offer Fast Internet Validity | Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट

Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट

गेल्या जुलै महिन्यात एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियाने रिचार्ज प्लॅनची ​​किंमत वाढवली होती. यानंतर, सर्व कंपन्यांच्या युजर्सच्या संख्येत बरेच बदल झाले आहेत. काही युजर्स बीएसएनएलकडे वळले. तर काहींनी आपले मोबाईल नंबर बंद केले होते. यानंतर, सर्व कंपन्या युजर्सना आपल्याकडे जोडण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. अशातच एका प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे आणि युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट मिळते.

एअरटेलचा एक शानदार प्लॅन आहे. एअरटेलचा हा 99 रुपयांचा प्लॅन येतो. या प्लॅनसोबत युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट सुविधा मिळू शकते आणि त्याची व्हॅलिडिटी 2 दिवसांसाठी आहे. या वापरासाठी कोणतीही मर्यादा दिलेली नाही. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 20GB इंटरनेट डेटा दिला जातो. तुम्ही फक्त विद्यमान प्लॅनमध्येच त्यांच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

जर तुमच्याकडे दुसरा प्लॅन असेल तरच तुम्ही त्यासोबत हा प्लॅन मिळवू शकता. म्हणजेच तुम्हाला वेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. जेव्हा इंटरनेटचा वापर जास्त होते, तेव्हा यूजर्स हा प्लान खरेदी करतात. याचबरोबर, जिओने सुद्धा स्वस्त प्लॅन आणला होता. यासाठी तुम्हाला 86 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. जिओ युजर्सना इंटरनेट डेटाचा लाभही मिळू शकतो. एअरटेल प्लॅनप्रमाणे, जिओ 20GB डेटाची दैनिक मर्यादा ऑफर करते. दोन्ही कंपन्या स्वस्त प्लॅन ऑफर करतात.

स्कॅमवरही बंदी घातली जातेय
स्कॅम रोखण्यासाठी सरकारकडूनही विविध पावले उचलली जात आहेत. नुकताच दूरसंचार विभागाकडून एक नवीन इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की,  तुम्ही आंतरराष्ट्रीय कॉल उचलणे टाळावे. असे कॉल्स स्कॅमर्सकडून आले असावेत असेही सांगण्यात आले आहे. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांनाही यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले होते.

Web Title: Airtel and Jio Recharge Less Than 100 Rupees Offer Fast Internet Validity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.