Airtel चे तीन नवीन प्लॅन लॉन्च; नेटफ्लिक्स, हॉटस्टारसह ३५० हून TV चॅनल्स पाहा मोफत!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:03 PM2022-05-30T22:03:50+5:302022-05-30T22:04:24+5:30
Bharti Airtel ने नवीन Xstream Fiber Broadband Plan लाँच केले आहेत. हे ब्रॉडबँड प्लॅन आधीच्या प्लॅनसारखेच आहेत.
नवी दिल्ली-
Bharti Airtel ने नवीन Xstream Fiber Broadband Plan लाँच केले आहेत. हे ब्रॉडबँड प्लॅन आधीच्या प्लॅनसारखेच आहेत. पण, या प्लॅन्समुळे यूजर्सना अधिक फायदे मिळतील. एअरटेलने तीन नवीन ब्रॉडबँड प्लॅन जाहीर केले आहेत.
एअरटेलच्या नवीन ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ६९९ रुपये, १०९९ रुपये आणि १५९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये Airtel 4K Xstream Box 350 चॅनेल्सही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. एअरटेलच्या तीनही नव्या प्लॅन्सची माहिती जाणून घेऊयात...
एअरटेलचा 1,599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
ब्रॉडबँड प्लॅनमध्ये युझर्सना Airtel 4K Xstream Box सह ३५० हून अधिक चॅनेल्सचा अॅक्सेस दिला जाईल. मात्र, बॉक्ससाठी २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. हे फक्त एकवेळचं शुल्क असणार आहे. या सेटअप बॉक्ससह, युझर्स केबल टीव्हीसह OTT कंटेंन्ट देखील पाहू शकणार आहेत.
या प्लॅनमध्ये यूजर्सना 300Mbps चा इंटरनेट स्पीड दिला जातो. याशिवाय, Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर देखील विनामूल्य प्रवेश दिला जातो. या योजनेसह, SonyLIV, ErosNow, Lionsgate Play, Hoichoi, ManoramaMax, Shemaroo, Ultra, HungamaPlay, EPICon, DivoTV, Klikk, Nammaflix, Dollywood आणि Shorts TV सारख्या 14 OTT प्लॅटफॉर्म सहज उपलब्ध होऊन जातील. युझर्स एका महिन्यात 3.3TB डेटा वापरू शकतात.
एअरटेलचा 1,099 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
कंपनीने १,०९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन देखील लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये 200Mbps स्पीड 3.3TB पर्यंत डेटा दिला जातो. त्याचे OTT फायदे १,५९९ रुपयांच्या Airtel ब्रॉडबँड प्लॅनसारखेच आहेत. पण, यासोबत तुम्हाला Netflix चे सबस्क्रिप्शन मिळणार नाही. या प्लॅनसह तुम्ही Airtel Xstream Box ऑफरचाही लाभ घेऊ शकता.
एअरटेलचा ६९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
Airtel ने लॉन्च केलेला तिसरा प्लॅन ६९९ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 40Mbps चा इंटरनेट स्पीड देण्यात आला आहे. यामध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वगळता वर नमूद केलेले सर्व OTT प्लॅटफॉर्म सहज उपलब्ध होतील. त्याचे उर्वरित फायदे वरील प्लॅन प्रमाणेच आहेत.