Airtel ग्राहकांना मिळणार Amazon Prime आणि Netflixचं फ्री सब्सक्रिप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:09 PM2019-05-02T15:09:42+5:302019-05-02T15:20:01+5:30

#AirtelThanks नुसार कंपनी आपल्या पार्टनर्ससोबत ग्राहकांना ऑफर्स देणार आहे.

Airtel customers will get Amazon Prime and Netflix free subscriptionsairtel thanks re launched users can get amazon prime and netflix subscription | Airtel ग्राहकांना मिळणार Amazon Prime आणि Netflixचं फ्री सब्सक्रिप्शन

Airtel ग्राहकांना मिळणार Amazon Prime आणि Netflixचं फ्री सब्सक्रिप्शन

Next

नवी दिल्ली : भारतीय टेलीकॉम कंपनी एअरटेलने #AirtelThanks कस्टमर प्रोग्रामला पुन्हा एकदा लॉन्च केले आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून एअरटेल आपल्या ग्राहकांना रिवॉर्ड देत आहे. यामध्ये सिल्वर, गोल्ड आणि प्लेटिनम असे तीन टप्पे आहेत. ग्राहकांना याचे वेगवेगळे फायदे मिळणार आहेत. 

#AirtelThanks नुसार कंपनी आपल्या पार्टनर्ससोबत ग्राहकांना ऑफर्स देणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही एअरटेलचा वापर करत असाला तर तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, Zee5 आणि Wynk Music याचे सब्सक्रिप्शन मिळू शकते. एअरटेलच्या माहिनुसार, ग्राहकांसाठी कस्टमाइज्ड ऑफर्स असणार आहेत. AirtelThanks नुसार ग्राहकांना डिव्हाईस सिक्युरिटी आणि व्हिआयपी कॉनेट्सपासून सरप्राईज ऑफर्स मिळणार आहेत. 

Silver Tier बेसिक कॉन्टेंट सर्व्हिससाठी आहे. यामध्ये ग्राहकांना Airtel TV, Wynk सब्सक्रिप्शन मिळणार आहे. गोल्डमध्ये ग्राहकांना अ‍ॅड ऑन टेलिकॉम बेनिफिट्स आणि प्रीमियम कॉन्टेंटचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. तर प्लेटिनममध्ये ग्राहकांना एअरटेलकडून VIP सर्व्हिस मिळणार आहे. तसेच, प्रिमियम कॉन्टेंट, ई-बुक, डिव्हाईस प्रोटेक्सन आणि सेल्समध्ये प्रायॉरिटी अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे. 
भारती एअरटेलचे चीफ प्रोडक्ट अधिकारी आदर्श नायर यांनी सांगितले, 'AirtelThanks ला टेक्नॉलॉजी आणि अनेक पार्टनर्शिप्ससोबत मिळून तयार केले आहे. ग्राहकांना गरजेपेक्षा अधिक चांगला अनुभव मिळेल. आम्ही डेटा सायन्स, मशिन लर्निंग आणि स्मार्ट API मध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे अ‍ॅमेझॉन यासारख्या डिजिटल फर्स्ट ब्रांडसोबत मिळून असे अनुभव घेऊ.'

Amazon Prime सब्सक्रिप्शन फ्री
एअरटेल प्रीपेड ग्राहकांना सुद्धा कंपनी अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देत आहे. Airtel Thanks नुसार कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना नवी ऑफर घेऊन आली आहे. 299 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये 28 दिवसांची मर्यादा आहे. तसेच, यामध्ये अॅमेझॉन प्राईमची फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. याशिवाय, दररोज 2.5 जीबी डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच, अ‍ॅमेझॉन प्राईम म्युजिक सुद्धा फ्री मिळणार आहे.  

एअरटेलने अ‍ॅपला रिनेम करुन Airtel Thanks केला आहे. दरम्यान, ग्राहकांना Airtel Thanks डाऊनलोड केल्यानंतरच या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.  

Web Title: Airtel customers will get Amazon Prime and Netflix free subscriptionsairtel thanks re launched users can get amazon prime and netflix subscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.