Airtel Digital TV चा नवीन प्लॅन; एका वर्षासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:02 PM2019-05-24T16:02:28+5:302019-05-24T16:03:59+5:30

कंपनीने Reliance Jio यांच्यासह इतर ऑपरेटर्संना टक्कर देण्यासाठी नवीन प्लॅन बाजारात आणले आहेत.

Airtel Digital TV Introduces New Long-Term DTH Packs for SD, HD Subscribers | Airtel Digital TV चा नवीन प्लॅन; एका वर्षासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये 

Airtel Digital TV चा नवीन प्लॅन; एका वर्षासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये 

googlenewsNext

नवी दिल्ली : Airtel Digital TV ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॅक जारी केला आहेत. कंपनीने सहा नवीन लॉन्ग टर्म प्लॅन आणले आहेत. यामध्ये सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत मर्यादा असलेले प्लॅन आहेत. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे चॅनल्स पाहता येणार आहे. याआधीही कंपनीने काही रिजनल पॅक जारी केले होते. हे प्लॅन कंपनीने Reliance Jio यांच्यासह इतर ऑपरेटर्संना टक्कर देण्यासाठी बाजारात आणले आहे.  

Hindi Value SD Pack:  या प्लॅनची मर्यादा सहा महिन्यांची आहे. याची किंमत महिन्याला 280 रुपये आहे. यामध्ये झी, स्टारसमेत इतर चॅनल्सचा समावेश आहे. या पॅकची मर्यादा 195 दिवसांसाठी (180 दिवस + 15 दिवस अतिरिक्त) दिली आहे. सहा महिन्यासाठी ग्राहकांना 1,681 रुपये द्यावे लागतील. तर, एक वर्षांसाठी 3, 081 रुपये द्यावे लागतील. ही किंमत सँडर्ड कनेक्शनसाठी आहे. मल्टीपल कनेक्शनसाठी याची किंमत 2,431 रुपये आहे. 

UDP Pack: हा एसडी पॅकची मर्यादा सहा महिन्यांसाठी आहे.यासाठी ग्राहकांना 799 रुपये द्यावे लागतील. तर एक वर्षासाठी 1,349 रुपये मोजावे लागतील. ही किंमत सँडर्ड आणि मल्टी-टीव्ही सब्सक्रिप्शन दोन्हींसाठी आहे.   

Gujarat Mega SD:  याची मर्यादा सहा महिन्यासाठी (180 दिवस + 15 दिवस अतिरिक्त) आहे. या पॅकचे मासिक शुल्क 510 रुपये आहे. तर सहा महिन्यांसाठी 3,062 रुपये आणि एक वर्षासाठी 5,612 लागणार असून ही किंमत सँडर्ड कनेक्शनसाठी आहे. मल्टीपल कनेक्शनसाठी सहा महिन्याच्या कालावधीसाठी  2,424 आणि एक वर्षासाठी 4,444 रुपये लागणार आहेत.

Gujarat Value Sports SD Pack: या पॅकचा कालावधी सहा महिन्याचा आणि 365 दिवसांचा आहे. या पॅकची किंमत सहा महिन्यासाठी 336 रुपये आहे. तर सहा महिन्यांच्या स्टँडर्ड कनेक्शन युजर्ससाठी  2,016 रुपये आणि मल्टी-टीव्ही कनेक्शनसाठी  1,662 रुपये द्यावे लागणार आहेत. तर एक वर्षासाठी 3,696 रुपये (सँडर्ड) आणि 3,047 रुपये (मल्टिपल कनेक्शन) द्यावे लागणार.  

Gujarat Value Sports HD आणि Gujarat Mega HD: हे दोन एचडी पॅक आहेत. दोन्हीही पॅक सहा आणि बारा महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. Gujarat Value Sports HD पॅकची किंमत दर महिना 475 रुपये आहे. तर सहा महिन्यांसाठी 2,851 रुपये मोजावे लागतील. या प्लॅन एका वर्षासाठी सब्सक्राईब करण्यासाठी 5,227 लागणार आहेत. मल्टी-टीव्ही कनेक्शनसाठी सहा महिन्यासाठी  2,352 रुपये तर एक वर्षासाठी 4,312 रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत.    

Gujarat Mega HD पॅकची मासिक किंमत 699 रुपये आहे. सहा महिन्यासाठी  4,197 रुपये आणि एक वर्षासाठी 7,689 रुपये ग्राहकांना द्यावे लागतील. मल्टी-टीव्ही कनेक्शनसाठी सहा महिन्यांसाठी 3,276 रुपये आणि एक वर्षासाठी 6,006 रुपये द्यावे लागतील.   
 

Web Title: Airtel Digital TV Introduces New Long-Term DTH Packs for SD, HD Subscribers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.