JioPhone Next ला कसे हाताळायचे एयरटेलला माहित आहे! - सीईओ गोपाळ विट्टल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 07:20 PM2021-09-03T19:20:09+5:302021-09-03T19:20:31+5:30
Airtel CEO On JioPhone Next: JioPhone Next च्या लाँचमुळे Airtel वर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीच्या सीईओना वाटते.
Reliance Jio चा सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन JioPhone Next 10 सप्टेंबरला भारतीयांच्या भेटीला येत आहे. परंतु या लाँचमुळे Airtel वर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीच्या सीईओना वाटते. एयरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोपाळ विट्टल यांनी ईटी टेलीकॉमला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांच्या मते, Jio Phone Next ला कसे हाताळायचे हे कंपनीला माहित आहे. तसेच एकंदरीत मार्केट पाहता चार ते सहा हजारात उपलब्ध होणारा JioPhone Next जास्त शेयर मिळवू शकणार नाही. कारण या किंमतीत चांगली क्वॉलिटी देणे शक्य नाही.
बँकांकडून कर्जासाठी मदत घेण्याऐवजी Airtel ने किफायतशीर हँडसेटसाठी ओरिजनल इक्यूपमेंट मेकर्सशी भागेदारी केली असती. टेलिकॉम कंपन्या हा पर्याय वापरू शकतात, असे विट्टल यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एयरटेलने याआधी काही बॅंकिंग पार्टनर्ससह मिळून वापरकर्त्यांना कर्ज दिले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी, एयरटेल ऑफलाइन किंवा ऑनलाइन एयरटेल स्टोरच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर ईएमआय ऑप्शन देत होती.
JioPhone Next
JioPhone Next स्मार्टफोन दोन मॉडेल्समध्ये सादर केला जाणार आहे. JioPhone Next Basic आणि JioPhone Next Advance अशी या दोन मॉडेल्सची नावे असतील, असे रिपोर्ट्समधून समजले आहे. यातील जियोफोन नेक्स्टच्या बेसिक मॉडेलची किंमत 5,000 रुपयांच्या आसपास असेल आणि जियोफोन नेक्स्ट अॅडव्हान्स मॉडेल 7,000 रुपयांच्या आसपास बाजारात सादर केला जाईल.
जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोन एकूण किंमतच्या फक्त 10% रक्कम देऊन विकत घेता येईल. असे असल्यास 5,000 रुपयांच्या जियोफोन नेक्स्ट बेसिक मॉडेलसाठी ग्राहकांना फक्त 500 रुपये द्यावे लागतील. तसेच 7,000 रुपयांचा जियोफोन नेक्स्ट अॅडव्हान्स व्हेरिएंट फक्त 700 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु या दोन्ही किंमती अजूनही अधिकृत झालेल्या नाहीत. येत्या काही दिवसात या बहुप्रतीक्षित स्मार्टफोनची संपूर्ण माहिती समोर येईल.