Airtel'ने Jio'चे टेन्शन वाढवलं! २३९ रुपयांत दिवस-रात्र 5G डाटा फ्री'मध्ये मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:32 PM2023-03-18T12:32:22+5:302023-03-18T12:34:12+5:30

देशात 5G सेवा लाँच झाली आहे. जिओने देशभरात  5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

airtel launch new free unlimited 5g plan-in competition jio welcome offer check all details | Airtel'ने Jio'चे टेन्शन वाढवलं! २३९ रुपयांत दिवस-रात्र 5G डाटा फ्री'मध्ये मिळणार

Airtel'ने Jio'चे टेन्शन वाढवलं! २३९ रुपयांत दिवस-रात्र 5G डाटा फ्री'मध्ये मिळणार

googlenewsNext

देशात 5G सेवा लाँच झाली आहे. जिओने देशभरात  5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता जिओला टक्कर देण्यासाठी Airtel नेही जोरदार तयारी केली असून जिओसारखीच ऑफर आता एअरटेलनेही लाँच केली. यामुळे आता एअरटेलच्या ग्राहकांना 5G सेवा वापरता येणार आहे. जिओने वेलकम ऑफर अंतर्गत जिओकडून आधीच अनलिमिटेड 5G डेटा ऑफर दिली आहे. ही ऑफर Jio प्री-पेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी २३९ रुपयांमध्ये आहे.

आता Jio च्या या वेलकम ऑफरच्या तुलनेत Airtel ने अमर्यादित 5G डेटा प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलने या संदर्भात घोषणा केली.आता वापरकर्ते अनलिमिटेड 5G डेटा वापरु शकतात. एअरटेलने 5G डेटा कॅप पूर्णपणे कमी केली आहे. एअरटेल वापरकर्ते रात्रंदिवस अनलिमिटेड जीबी डेटा वापरु शकतात. यासाठी, सर्व एअरटेल प्री-पेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी २३९ रुपये आणि त्याहून अधिकचे 4G रिचार्ज करणे अनिवार्य आहे. यापेक्षा कमी एअरटेल रिचार्जवर मोफत अनलिमिटेड 5G डेटा वापरता येणार नाही.

आता लग्नासाठीही कर्मचारी PF खात्यातून पैसे काढू शकतात; फक्त आहेत 'या' अटी

या अगोदर Airtel एका दिवसात जास्तीत जास्त 5 जीबी डेटा देत होते. आता यात वाढ करुन अनलिमिटेड करण्यात आली आहे. ज्या वापरकर्त्यांकडे 5G मोबाईल आहेत आणि ते Airtel 5G Plus नेटवर्कवर काम करतात, ते आता अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. Airtel 5G Plus सेवा जवळपास २७० शहरांमध्ये उपलब्ध आहे.

अनलिमिडेड 5G डेटा कसा सुरू करायचा? 

Airtel ग्राहकांनी अगोदर एअरटेल थँक्स अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. यानंतर, “अनलिमिटेड 5G डेटासाठी अॅप्लीकेशन करावे लागणार आहे. हे तुम्हाला प्रोफाइलमध्ये दिसेल. यासाठी, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात 5G नेटवर्क असणे  आवश्यक आहे.

Web Title: airtel launch new free unlimited 5g plan-in competition jio welcome offer check all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.