एयरटेलने आणला नवीन प्रीपेड प्लॅन; कोणत्याही डेली लिमिटविना दोन महिने वापरता येईल इंटरनेट  

By सिद्धेश जाधव | Published: June 17, 2021 12:08 PM2021-06-17T12:08:55+5:302021-06-17T12:09:53+5:30

Airtel 456 Prepaid Plan: एयरटेलच्या 456 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 50GB देण्यात आला आहे, या डेटासाठी कोणतीही डेली लिमिट देण्यात आली नाही.

Airtel launched rs 456 prepaid plan with 50gb data and 60 days validity  | एयरटेलने आणला नवीन प्रीपेड प्लॅन; कोणत्याही डेली लिमिटविना दोन महिने वापरता येईल इंटरनेट  

एयरटेलने आणला नवीन प्रीपेड प्लॅन; कोणत्याही डेली लिमिटविना दोन महिने वापरता येईल इंटरनेट  

googlenewsNext

टेलिकॉम कंपनी एयरटेल नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन्स सादर करत असते. त्यानुसार आता कंपनीने नवा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या नव्या प्लॅनची किंमत 456 रुपये आहे. 60 दिवस म्हणजे जवळपास दोन महिन्यांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये कोणतीही डेटा लिमिट देण्यात आली नाही. चला जाणून घेऊया या प्लॅनची संपूर्ण माहिती.  

एयरटेलचा 456 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 

एयरटेलच्या 456 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 50GB देण्यात आला आहे, या डेटासाठी कोणतीही डेली लिमिट देण्यात आली नाही. या प्लॅनची वैधता 60 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि रोज 100SMS असे फायदे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या प्लॅनसह एयरटेल युजर्सना Amazon Prime Video Mobile Edition चे फ्री ट्रायल तीस दिवसांसाठी मिळते. या प्लॅनमध्ये युजर्सना Airtel Xtream Premium चा अ‍ॅक्सेस देखील मिळतो. तसेच, हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना फ्री हेलोट्यून्सचा फायदा मिळेल.  

Airtel च्या 456 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना मोफत Wynk Music, Apollo 24/7 सर्कल मेम्बरशिप (तीन महीने), एक वर्षासाठी Upskill आणि Shaw Academy चा अ‍ॅक्सेस आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक असे फायदे देखील मिळतील.  

दोन महिन्यांत 50GB डेटा संपला तरी युजर्स अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस वापरू शकतील. जे लोक वायफाय सोबत अधूनमधून मोबाईल डेटाचा वापर करतात आणि कॉलिंगसाठी मोबाईल जास्त वापरतात त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकतो.  

Web Title: Airtel launched rs 456 prepaid plan with 50gb data and 60 days validity 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल