एअरटेलने लॉन्च केला 300Mbps स्पीडचा होम ब्रॉडबॅन्ड प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 02:45 PM2018-04-09T14:45:02+5:302018-04-09T14:46:18+5:30

भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील नामांकित कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला आहे.  एअरटेलने सुपर फास्ट होम ब्रॉडबॅन्ड प्लॅनची सुरुवात केली आहे. कंपनीने हा प्लॅन खासकरुन हाय स्पीड इंटरनेट वापर करतात, अशा ग्राहकांसाठी आणला आहे. 

Airtel launches 300Mbps speed home broadband plan | एअरटेलने लॉन्च केला 300Mbps स्पीडचा होम ब्रॉडबॅन्ड प्लॅन

एअरटेलने लॉन्च केला 300Mbps स्पीडचा होम ब्रॉडबॅन्ड प्लॅन

googlenewsNext
ठळक मुद्देएअरटेलची सुपर फास्ट होम ब्रॉडबॅन्ड प्लॅनची सुरुवात ग्राहकांना 300Mbps पर्यंत इंटरनेटचा स्पीड मिळणार

नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील नामांकित कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला आहे.  एअरटेलने सुपर फास्ट होम ब्रॉडबॅन्ड प्लॅनची सुरुवात केली आहे. कंपनीने हा प्लॅन खासकरुन हाय स्पीड इंटरनेट वापर करतात, अशा ग्राहकांसाठी आणला आहे. 

एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या प्लॅननुसार ग्राहकांना 300Mbps पर्यंत इंटरनेटचा स्पीड मिळणार आहे. खरंतर हा प्लॅन फायबर टू द होम (FTTH) वर आधारित आहे. यासाठी ग्राहकांना दर महिन्याला 2199 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे  1200GB अल्ट्रा हाय स्पीड डेटा मिळणार आहे. तसेच, अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग सुद्धा ग्राहकांना करता येणार आहे.  

दरम्यान, हा प्लॅन ग्राहकांनी घेतल्यास त्यांना एअरटेलच्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा मोफत मिळणार आहे. यामध्ये विंक म्युजिक आणि एअरटेल टीव्ही अॅप आहे. कंपनीच्या माहितीनुसार, विंक म्युजिकमध्ये तीन मिलियनहून अधिक गाणी आहेत. तर एअरटेल टीव्हीमध्ये 350 हून जास्त लाईव्ह चॅनल्स आणि 10 हजार पेक्षा जास्त चित्रपट आणि शोज आहेत.

भारती एअरटेल होम्सचे सीईओ जॉर्ज मॅथेन यांनी या प्लॅनच्या लॉन्चिगच्या वेळी सांगितले की, V Fiber होम ब्रॉडबॅन्डच्या यशानंतर आम्ही FTTH च्या आधारावर हाय स्पीड प्लॅन लॉन्च करत आहेत. शक्यतो हाय स्पीड डेटा वापरतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन आणला आहे. 
 

Web Title: Airtel launches 300Mbps speed home broadband plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.